लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सध्या बळीराजा धान पेरणीच्या लगबगीत गुंतला असून पेरणीसाठी नवीन संकरित किंवा सुधारित बियाणे खरेदी करण्याच्या धावपळीत आहे. याच संधीचा लाभ घेत काही बियाणे विक्रेते शेतकऱ्यांची लूट करतात. शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे खरेदी करूनच पेरणी करावी, असे कृषी विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.मागील काही वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी चांगलाच तोट्यात आला आहे. मात्र यंदा तरी निसर्ग पावणार ही आशा बाळगून शेतकरी पुन्हा शेतीच्या कामाला लागला आहे. बियाण्यांची खरेदी करण्यासाठी आता त्यांची धावपळ सुरू आहे. नेमकी हीच संधी साधून साध्या भोळ््या शेतकऱ्याला लुटण्याचे काम काही विक्रेते करतात. नवनव्या कंपन्यांची नावे सांगून शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे देऊन त्यांची आर्थिक लूट करतात. यात मात्र कर्ज घेऊन शेती करणारा शेतकरी मारला जाते.पेरणीची वेळ येण्यापूर्वी अनेक बियाणे विक्रेते प्रमाणित नसलेल्या बियाण्यांचा खप वाढविण्यासाठी आकर्षक जाहीराती व फसवा प्रचार-प्रसार करण्याचे काम करतात. यासाठी विक्रेते काही स्थानिक कृषी केंद्र चालकांना सुद्धा यासाठी प्रलोभन देतात.बियाण्यांवर अतिरिक्त कमिशन देण्याची हमी देऊन बोगस बियाणे विक्री करायला तयार करतात. येथूनच शेतकऱ्यांची लूट सुरू होते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता शेतकऱ्यांनी आय. एस. ओ प्रमाणित बियाणे तसेच मानांकित कंपनीचे बियाणे खरेदी करून पेरणी करावी असे कृषी विभागाने कळविले आहे.
बोगस बियाण्यांपासून सावध राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 20:28 IST
सध्या बळीराजा धान पेरणीच्या लगबगीत गुंतला असून पेरणीसाठी नवीन संकरित किंवा सुधारित बियाणे खरेदी करण्याच्या धावपळीत आहे. याच संधीचा लाभ घेत काही बियाणे विक्रेते शेतकऱ्यांची लूट करतात. शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे खरेदी करूनच पेरणी करावी, असे कृषी विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
बोगस बियाण्यांपासून सावध राहा
ठळक मुद्देकृषी विभाग : बियाणे विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट