गोंदिया : काळसर, सडलेल्या अवस्थेत असलेली ११ लाख ७० हजार रूपये किमतीची सुपारी २६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव डुग्गीपारच्या पोलिसांनी पकडली. या संदर्भात डुग्गीपार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता दरम्यान महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव येथील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डेहनकर, पोलीस उपनिरीक्षक गेडाम, सहाय्यक फौजदार गावंडे, पोलीस हवालदार पाटील, पोलीस नायक शिवणकर हे दैनंदिनी मोटार वाहन कायद्याचे केसेस करण्यासाठी वाहनांची तपासणी राज्य महामार्ग क्रमांक २७५ वर करीत होते. वाहन तपासणी करीत असताना ट्रक क्रमांक सी.जी.- ०८/एएन- ६१०७ या वाहनाला थांबवून वाहनाची तपासणी केली असता वाहनात असलेले वेगवेगळे पोतींमध्ये लालसर काळी अशी सडलेली ११ हजार ५५० किलो सुपारी किंमत २२ लाख ६९ हजार ५७५ रुपयाची सुपारी जप्त केली. त्या सुपारीचे ई-बिल नव्हते. ही सुपारी मानवी आरोग्यास हानिकारक होऊ शकते. सडल्या सुपारीवर बंदी असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग गोंदिया यांच्या मार्फतीने कारवाई करण्यात आली.