शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४० लाखांत घेतली सुपारी, हाती आले पाच हजार! नागसेनच्या घरी राहून आठवडाभर केली रेकी  

By नरेश रहिले | Updated: January 14, 2024 18:22 IST

काम झाल्यावरच पैसे दिले जातील असे ठरल्याने आराेपींनी गोंदियात आठ दिवस मुक्काम केला होता.

गोंदिया: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव (४२, रा. बाराखोली, सिंधी कॉलनी, गोंदिया) यांच्यावर गुरुवारी (दि. ११) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गोळीबार करणाऱ्या आरोपींना ४० लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात आरोपींना फक्त पाच हजार रुपये देण्यात आले होते; परंतु आरोपींनी दिलेली ही माहिती सत्य की निव्वळ चर्चाच याचा उलगडा मुख्य आरोपीच्या अटकेनंतरच होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

आर्थिक व्यवहारातून माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींनी त्यांच्यावर कुणाचे लक्षही जाऊ नये यासाठी मोठ्या शिताफीने गुन्हेगारी जगतात नसलेल्या तरुणांची निवड केली. या प्रकरणात कल्लू यादव यांचा काटा काढण्यासाठी आरोपीने तब्बल ४० लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे; परंतु ठरलेल्या ४० लाखांपैकी फक्त पाच हजार रुपये आणि बंदूक आरोपींपर्यंत पोहोचवण्यात आली. काम झाल्यावरच पैसे दिले जातील असे ठरल्याने आराेपींनी गोंदियात आठ दिवस मुक्काम केला होता. या आठवडाभरात कल्लू यादव कुठे राहतात, कुठे जातात, कशाने जातात, त्यांच्या कोणत्या कामाची कोणती वेळ आहे, त्यांच्या सोबत कोणकोण असतात, एकापेक्षा जास्त लोक असले तर आपण कोणत्या पद्धतीने गोळीबार करायचा याचा इत्यंभूत आराखडा आरोपींनी तयार केला होता. या आठ दिवसांत त्यांच्या राहण्याची सोय नागसेन बोधी मंतो (४१, रा. गौतम बुद्ध वॉर्ड, श्रीनगर, गोंदिया) याच्या घरी करण्यात आली होती, तसेच गोंदियातील एका लॉजमध्येही ते थांबले होते. आठ दिवस गोंदियात राहून त्यांनी रेकी केली होती. पुरावा नष्ट करण्याच्या तयारीतूनच रचला कटकल्लू यादव प्रकरणात पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या तपासात आरोपी प्रशांत मेश्राम हा मुख्य आरोपी असल्याचे पुढे आले आहे. त्याने आपण या प्रकरणात अडकू नये यासाठी बंदूक दुसऱ्याच्या हातात दिली. दुसऱ्याने तिसऱ्याच्या हातात, तिसऱ्याने चौथ्याच्या हातात अशी ती बंदूक आरोपीच्या हातात पोहोचली. या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा आरोपींचा मानस असल्याचे पोलिसांच्या लक्षात येत आहे. दोघांना २२ पर्यंत पोलिस कोठडीकल्लू यादव यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या आणखी दोन आरोपींना शहर पोलिसांनी शनिवारी (दि.१३) रात्री ९ वाजता अटक केली आहे. शुभम विजय हुमने (२७, रा. भीमनगर, गोंदिया) व सुमित ऊर्फ पंछी विकास डोंगरे (२३, रा. कुंभारेनगर, गोंदिया), अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांनाही २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात स्पष्ट झालेल्या आरोपींची संख्या आठ झाली असून, यातून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी फरार आहेत.

टॅग्स :gondiya-acगोंदियाArrestअटक