शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम आरोग्य सेवा प्रत्येकाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 20:25 IST

समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहचविणाच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नरत आहोत. यामुळेच रजेगाव येथे ग्रामीण रूग्णालयाची स्थापना करण्यात आली असून ग्रामीण भागात नऊ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसोबतच खमारी येथील अतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : सावरी येथील प्राथमिक आरोग्य उपकें द्राचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहचविणाच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नरत आहोत. यामुळेच रजेगाव येथे ग्रामीण रूग्णालयाची स्थापना करण्यात आली असून ग्रामीण भागात नऊ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसोबतच खमारी येथील अतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे. बाई गंगाबाई रूग्णालयातील खाटांची संख्या वाढविली असून केटीएस रूग्णालयात सिटीस्कॅन मशीनसाठी निधी मंजूर करवून घेतला. उत्तम आरोग्य सेवा प्रत्येकाचा हक्क असून ही सेवा उपलब्ध करवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिली.तालुक्यातील ग्राम सावरी येथे ५० लाख रूपयांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला कॉंँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे उपस्थित होते. याप्रसंगी सभापती दोनोडे यांनी, आमदार अग्रवाल हे क्षेत्रातील सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करतात. यातूनच तालुक्यात नऊ उपकेंद्र स्थापन करण्यात आले असून आरोग्य सेवा पुरविली जात असल्याचे मत व्यक्त केले. पंचायत समिती सभापती हरिणखेडे यांनी, विकासाच्या प्रत्येकच क्षेत्रात गोंदिया तालुका अव्वल असल्याचे सांगीतले. याप्रसंगी चमन बिसेन, उषा मेंढे, विमल नागपुरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, स्नेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, योगेश अग्रवाल, कमलेश्वरी लिल्हारे, रमेश लिल्हारे, नरेंद्रसिंग चिखलोंडे, डिलेश्वरी पटले यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल