परसवाडा : पतंप्रधान घरकुल योजनेंतर्गत आता ५ ब्रास रेती मोफत देण्यास मंजुरी दिली आहे. तहसीलदारांमार्फत रेतीचे वितरण केले जात असल्याने लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लगात आहेत. तर कर्मचारी त्यांची टोलवाटोलवी करीत असल्याने आता लाभार्थ्यांना पाटपीट करावी लागत आहे.
घरकुल लाभार्थी रेतीसाठी तहसील कार्यालयात गेल्यावर कर्मचारी कार्यालयात उपस्थित न राहता लाभार्थ्यांची दिशाभूल करून करतात. मोफत रेती परवाना देत नसून आठ दिवसांनंतर देण्यात येईल व वेळेची दिवसाची मुभा न देता एकाच दिवशी ५ गाडी रेती नेण्यास सांगतिले जात आहे. कर्मचारी ११ वाजता रेती घाटावर येतात. मात्र घाटावर १०० वर ट्रॅक्टर असतात अशात एवढी रेती कशी भरणार, असा प्रश्न पडतो. त्यात एकदाच परवानगी दिली तर नंतर देण्यात येत नाही. बिना परवाना रेतीची वाहतूक करणे सुरू आहे. यामुळे पिपरीया घाटावर यात्रेचे स्वरूप आले आहे. ज्या लाभार्थ्यांची रेती अपुरी राहील त्यांना दुसऱ्या दिवशी किंवा लाभार्थीच्या सोईनुसार देण्यात यावी, अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांनी केली आहे.