शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीत लाभार्थ्यांची पायपीट

By admin | Updated: August 21, 2014 23:56 IST

दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना राहण्यासाठी स्वत:चे घर व्हावे, उन्हातान्हातून आल्यानंतर थोडा विसावा मिळावा यासाठी हक्काचा निवारा असावा म्हणून शासनाच्या वतीने

अमरचंद ठवरे - बोंडगावदेवीदारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना राहण्यासाठी स्वत:चे घर व्हावे, उन्हातान्हातून आल्यानंतर थोडा विसावा मिळावा यासाठी हक्काचा निवारा असावा म्हणून शासनाच्या वतीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुल योजना राबविली जाते. गेल्या काही वर्षापासून त्याचे अर्जुनी मोरगाव तालुक्यात अनेक लाभार्थी आहेत. परंतू लाभार्थ्यांना प्रत्यक्ष योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.निवड झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना अनुदानाची राशी धनादेशाव्दारे पंचायत समितीच्या वतीने टप्याटप्याने देण्यात येते. सध्यातरी पंचायत समिती अर्जुनी/मोरगाव येथे घरकुल लाभार्थ्यांची बोळवण केली जात असून लाभार्थ्यांना कमालीचा मन:स्ताप सहन करावा लागत आहे.दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्या सर्वसामान्य जनतेला हक्काचा निवारा मिळावा यासाठी इंदिरा आवास योजना, रमाई, राजीव गांधी निवारा योजनेअंतर्गत घरकुल योजना राबविण्यात येत आहे. ६८ ते ७० हजारापर्यंतचे अनुदान शासनातर्फे देण्यात येते. तालुक्यातील निवड झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी वेळोवेळी अनुदान राशी उपलब्ध होण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात स्वतंत्रपणे एका बांधकाम विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यानी अनुदानाचा उपयोग घरकुलाच्या निर्माणाधीन कार्यासाठीच करावा यासाठी धनादेश वितरण करताना काही निकषांची पूर्तता करणे जरूरीचे आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी पैशाची जमवा-जमव करावी लागते. घरकुलाचे अनुदान, तीन टप्यात पंचायत समितीच्या बांधकाम विभागामार्फत धनादेशाच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांना वितरीत केल्या जातो. निवड झालेला लाभार्थी पहिला हप्त्याच्या बिलासाठी पंचायत समिती कार्यालयाची पायरी गाठतो. तेव्हा संबंधीत कर्मचारी स्वत: आपणाकडून पैसे देत असल्याच्या तोऱ्यात वावरून सर्वसामान्य घरकुल लाभार्थ्यांची बोळवण करतो. घरकुल बांधकामाचा प्रगती अहवाल संबंधित ग्रामपंचायतच्या सचिवाकडून आणून सुध्दा वेळेच्या आत लाभार्थ्यांना अनुदानाचा धनादेश मिळत नाही, अशी कैफीयत राजोली येथील एक घरकुल लाभार्थ्यांने लोकमतजवळ मांडली. लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाचा प्रगती अहवालासह बील सादर केल्यानंतर त्या लाभार्थ्यांस जास्तीत-जास्त आठ दिवसात धनादेश मिळणे गरजेचे आहे. परंतु पंचायत समिती कार्यालयााकडून लाभार्थ्यांना वेळेच्या आत घरकुलाचे धनादेश मिळत नाही. एक-दोन महिन्याचा कालावधी झाल्यानंतर धनादेश मिळत असल्याची ओरड घरकुल लाभार्थ्यांची आहे. संबंधित कर्मचारी वेळकाढू धोरण अंगीकारत असल्याने लाभार्थ्यांना अनेकदा पंचायत समिती कार्यालयाची पायपीट करावी लागते. याकडे संबंधीत लोकप्रतिनिधी डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. विभागातील कामचुकार कर्मचाऱ्यावर बिडीओचा वचक नसल्याने हे सर्व घडत असल्याचे पंचायत समिती परिसरात दबक्या आवाजात बोलल्या जाते. एकंदरीत घरकुल लाभार्थ्यांना धनादेशासाठी पंचायत समिती कार्यालयाच्या वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.