गोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या कटंगी बुज येथील एका तरुणीवर आरोपी सुनील धनलाल सोनवाने (३०) याचे प्रेम जडले. त्या प्रेमातून त्या तरुणीला पळवून नेण्याचा माणस आरोपी सुनील सोनवाने याचा असल्याने त्याला मुलीच्या आईने विरोध केला. परिणामी त्यांच्यात वाद झाला. प्रियकराने प्रेयसीच्या आईवर पिस्तूल ताणून ठार करण्याची धमकी दिली. ही घटना ११ जानेवारीच्या दुपारी ४ वाजता असली तरी या संदर्भात शनिवारच्या रात्री ११ वाजता गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कटंगी बुज येथील ४५ वर्षाची महिला आपल्या दुकानासमोर उभी असताना आरोपी डुमेश्वर उर्फ डुमेर सुखराम चौरागडे (४२) याने तिच्या दुकानासमोर येऊन अश्लिल शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर तिला रस्त्यावर निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला. गळा दाबून ठार मारण्याचाही त्याचा प्रयत्न होता. यावेळी पिडीत महिलेच्या मुलीचा प्रियकर आरोपी सुनील याने ही तिच्यावर पिस्तूल ताणून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात मुलीच्या आईने दोघांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली. परंतु पोलिसांनी या संबंधी गुन्हा दाखल केला नव्हता. यावर त्या महिलेने न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाच्या आदेशावरून आरोपीविरूध्द भादंविच्या कलम २९४, ३२३, ५५४, ३०७, ४९९,५००, ५०४ सहकलम ३,४ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
प्रेयसीच्या आईवर ताणली बंदूक
By admin | Updated: March 6, 2017 00:50 IST