शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
3
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
4
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
5
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
6
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
7
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
8
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
9
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
10
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
11
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
12
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
13
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
14
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
15
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
16
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
17
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
18
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
19
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
20
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मिशन इंद्रधनुष्यला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माने म्हणाले, एच.आय.व्ही.एड्सचे प्रतिबंधनात्मक दृष्टिकोनातून जनतेमध्ये असलेले गैरसमज व उपाययोजना याकरीता मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राद्वारे सर्व शासकीय रुग्णालयात एड्स बाधित रुग्णांना मोफत उपचार सल्ला व नि:शुल्क चाचणी करण्यात येते.

ठळक मुद्देगर्भवती महिलांना पाच हजार रुपयांचे अनुदान : शासनाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा सामान्य रु ग्णालयाच्या प्रांगणात विशेष मिशन इंद्रधनुष्य,प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सप्ताह आणि जागतिक एड्स दिन कार्यक्र माचे उद्घाटन सोमवारी (दि.२) करण्यात आले.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या वेळी प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जि.प.आरोग्य व शिक्षण समिती सभापती रमेश अंबुले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम.बी.दुधे, न्या.एम.आर.वानखेडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज राऊत, माता बाल संगोपन अधिकारी डॉ.नितीन कापसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी वानखेडे, जिल्हा कार्यक्र म समन्वयक कैलास खांडेकर, जिल्हा पर्यवेक्षक संजय जेनेकर उपस्थित होते.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माने म्हणाले, एच.आय.व्ही.एड्सचे प्रतिबंधनात्मक दृष्टिकोनातून जनतेमध्ये असलेले गैरसमज व उपाययोजना याकरीता मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राद्वारे सर्व शासकीय रुग्णालयात एड्स बाधित रुग्णांना मोफत उपचार सल्ला व नि:शुल्क चाचणी करण्यात येते. जनतेने न घाबरता ए.आर.टी.औषधोपचार घेतल्यास एच.आय.व्ही.बाधित व्यक्ती सामान्य जीवन जगू शकतो. डॉ. दयानिधी म्हणाले, विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत पालकांनी संपूर्ण लसीकरण करून घ्यावे. या मोहिमेअंतर्गत २ डिसेंबरपासून मार्च अखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत अर्धवट लसीकरण व लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांचा शोध घेऊन नियमित लसीकरणा व्यतिरिक्त अतिरिक्त सत्र लावून संपूर्ण लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली.डॉ. निमगडे म्हणाले, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील मातांना शासनाकडून टप्प्याटप्प्याने त्यांचे आधार सीड बँक खात्यात पाच हजार रु पये आर्थिक लाभ देण्यात येतो. सर्व गरोदर मातांनी बँकेमध्ये आपल्या नावाचे खाते उघडून घ्यावी,जेणेकरून सदर वेळेस त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. २ डिसेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सप्ताह राबविण्यात येणार आहे.यामध्ये जिल्ह्यातील सर्व पहिल्या टप्प्यातील मातांना टप्प्याटप्प्याने ५ हजार रु पये लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक आशामार्फत कमीत कमी पाच नवीन नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.प्रारंभी हिरवी झेंडी दाखवून मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या वेळी प्रभातफेरीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम २.० अंतर्गत जिल्ह्यातील अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत शोध घेऊन अतिरिक्त सत्र लावून बालकांचे संपूर्ण लसीकरण करण्यात येणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदhospitalहॉस्पिटल