शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कचारगड यात्रेला सुरूवात

By admin | Updated: February 9, 2017 01:00 IST

वीस कोटी आदिवासींचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड येथील वार्षिक यात्रेला सुरूवात झाली आहे.

आज ध्वजारोहण व महापूजेला सुरूवात : भाविकांचे जत्थे धनेगावात डेरेदाखल विजय मानकर  सालेकसा वीस कोटी आदिवासींचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड येथील वार्षिक यात्रेला सुरूवात झाली आहे. मोठ्या संख्येत विविध राज्यातून भाविक येथे दाखल झाले असून ९ फेब्रुवारीला ध्वजारोहण आणि महापूजेमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहे. विशेष करून बाहेर राज्यातील आदिवासी भाविक मोठ्या प्रमाणावर धनेगाव, दरेकसा परिसरात येऊन डेरेदाखल झाले आहेत. ८ फेब्रुवारी रोजी गोंडी संस्कृती व गोंडी धर्माबाबत विविध प्रकार ऐतिहासीक तथ्य प्रकट करणारे गोंडीधर्म प्रवचन, गोंडी संस्कृतीवर आधारीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि गडजागरण कार्यक्रम घेण्यात आला. भाविकांसाठी रात्रभर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भरपूर मनोरंजन व उद्बोधनाची पूरेपूर व्यवस्था आयोजन समितीने केली असून प्रत्येक भाविकाला कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. पोलीस विभागाच्या वतीने दरेकसा ते धनेगाव आणि धनेगाव ते कचारगड देवस्थान तसेच मोठ्या गुफेपर्यंत ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलो आहे. पोलीस विभागाच्या वतीने एकीकडे सुरक्षेची व्यवस्था केली जात आहे. त्याप्रमाणे गुफेकडे जाताना पहाड चढताना भाविकांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस कमांडो तैनात करण्यात आले आहे. दरम्यान भाविकांची प्रकृती बिघडल्यास किंवा अनावधानाने एखादा अपघात घडल्यास त्यांना ताबडतोब औषधोपचार मिळावे म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने ठिकठिकाणी आरोग्य कॅम्प व प्राथमिक उपचार व्यवस्था स्थापित करण्यात आली आहे. गरज पडल्यास अ‍ॅम्बुलन्सची सोय सुध्दा ठेवण्यात आली आहे. याशिवाय काही स्वयंसेवी संस्थासुध्दा आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. काही संस्थांनी ब्लड कॅम्प सुध्दा लावले आहेत. स्थानिक आ. संजय पुराम यात्रा सुरु होण्यापूर्वीपासून व्यवस्थेबाबत सतत आढावा घेताना दिसून आले. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रम शिस्तबध्द होत आहे. ९ ला सकाळी गोंडी धर्म प्रचारक शीतल मरकाम यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वज फडकावण्यात येईल. त्यानंतर आ. संजय पुराम गोंडवाना सामाजिक ध्वज फडकावतील या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दादा हिरासिंह मरकाम व कचारगडचे प्रवर्तक के.बा. मरस्कोल्हे भूषविणार आहेत. या वेळी गोंडी धर्मातील विविध मान्यवर धर्माचार्य, लेखक इतिहासकार व उच्च पदस्थ व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. यात राजे वासुदेव शाह टेकाम, चंद्रलेखा मोतीरावण कंगाली, भरतलाल कोर्राम, मनमोहन शाह वट्टी, डॉ.हरिश्चंद्र सलाम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.