शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

तिकीट मशिन्स वाढवताहेत रेल्वेच्या पार्सल रूमची शोभा

By admin | Updated: May 18, 2016 01:53 IST

गोंदिया स्थानकावरील तिकीट खिडक्यांसमोर प्रवाशांची लागणारी लांबच लांब रांग बघता रेल्वे विभागाकडून...

महिना लोटूनही कार्यान्वित नाही : तिकिटांसाठी वाढतेय गर्दीदेवानंद शहारे गोंदियागोंदिया स्थानकावरील तिकीट खिडक्यांसमोर प्रवाशांची लागणारी लांबच लांब रांग बघता रेल्वे विभागाकडून ‘क्वॉईन आॅपरेटर आॅटोमेटिक तिकीट वेंडिंग मशीन’ची व्यवस्था होणार आहे. अशा आठ मशिन्स गोंदिया स्थानकावर लागणार आहेत. आठपैकी दोन मशिन्स गोंदिया रेल्वे स्थानकाला उपलब्धही झाल्या आहेत. मात्र उपलब्ध झालेल्या त्या दोन मशिन्स पार्सल विभागात महिनाभरापासून ठेवल्या आहेत. मात्र मुख्यालयावरून कोणताही आदेश न आल्याने त्या क्रियान्वित करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी भर उन्हाळ्याच्या हंगामात तिकिटांसाठी प्रवाशांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहे.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे स्थानक अशी गोंदियाची ख्याती आहे. गोंदिया स्थानकावरून नागपूर, रायपूर, बालाघाट व चंद्रपूर या चारही दिशांना रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. स्थानकाच्या दोन्ही बाजूंना तीन-तीन तिकीट काऊंटर आहेत. तरी तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लागत असल्याने गोंदिया शहरात सात ठिकाणी खासगीरीत्या बुकिंग सेवा देण्यात आली आहे. त्यात केवळ एक रूपया प्रतितिकीट अधिक घेवून तिकीट उपलब्ध करून दिली जात आहे. असे असतानाही प्रवाशांच्या संख्येत वाढच होत असल्याने रेल्वे प्रशासनाने आठ आॅटोमेटिक तिकीट व्हेंडर मशिन्स लावण्याचे प्रस्तावित केले होते. यापैकी दोन मशिन्स महिनाभरापूर्वीच उपलब्ध झाल्या आहेत. मात्र वरिष्ठांचे इंस्ट्रक्शन्स, मेकॅनिक्स व इतर इंस्ट्रुमेंट आदिंबाबत कसल्याही सूचना उपलब्ध न झाल्याने त्या धूळ खात आहेत. तर आणखी सहा मशिन्स उपलब्ध होणे बाकीच आहेत. या उन्हाळ्याच्या ऋतूत सदर सर्व मशिन्स उपलब्ध होऊन संचालित झाल्या असत्या तर गोंदिया स्थानकावर स्वत:च तिकीट घेणे सुगम झाले असते. त्यांचा त्रास वाचला असता. प्रवाशांनी मशिनमध्ये शिक्के घातले की अगदी कमी वेळात मशिन तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रवाशाने दर्शविलेल्या स्थानकाचे तिकीट त्याला मिळेल. लोकल प्रवाशांच्या तिकिटांसाठी या मशिन्स अधिक उपयोगी ठरणार आहेत. मात्र या मशिन्स नेमक्या कधी संचालित होतील, हे रेल्वेचे अधिकारी ठामपणे सांगत नाही.काही दिवसांपूर्वी डीएमआर कंसल गोंदियात आले होते. विकास कार्यांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले, प्लॅटफॉर्म-२ वर दोन एस्कलेटर्स लावण्यात येतील. याशिवाय प्लॅटफॉर्म-३ वर दोन लिफ्ट व प्लॅटफॉर्म-१ वर एक लिफ्ट लावण्यात येत आहे. लिफ्ट लावण्यासाठी तसे बांधकाम होमप्लॅटफॉर्मवर सुरू आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लिफ्टशी संबंधित मशिन्स येतील व लिफ्ट सुरू करण्यात येईल, त्यानंतरच एक्सलेटरचे (स्वयंचलित पायऱ्या) काम सुरू करण्यात येईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या होमप्लॅटफॉर्मवर शेडचे बांधकाम पूर्णत्वास गेलेले आहे.गोंदिया स्थानकाचे आधुनिकीकरण संथ गतीनेगोंदिया-चंद्रपूर रेल्वे लाईनवर विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. हे काम गोंदिया ते नागभीडपर्यंत पूर्ण झालेले आहे. सदर रेल्वे लाईनवर एकूण १६ स्थानके आहेत. जेथे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे तेथे अडीच एचपीचा करंट देण्यात आला आहे. त्यामुळे विद्युत तारांची चोरी होऊ शकणार नाही.गोंदिया रेल्वे स्थानकावर आधीचे ३० सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. परंतु काही महिन्यांत आणखी १३ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार होते. ते लागले नाही. याशिवाय रेलटोली परिसरातील बुकिंग कार्यालय भवनाला विस्तारित करण्यात येणार आहे. गोंदिया स्थानकावर वॉटर रिसायकलिंग प्लाँट लावण्याची योजना आहे. मात्र ती प्रलंबितच असल्याचे दिसून येते. घाण अधिक पसरू नये यासाठी रेल्वे गाड्यांमध्ये डस्टबीन ठेवण्यात येतील, अशी घोषणा कंसल यांनी केली होती. परंतु अद्याप कोणत्याही गाड्यांमध्ये डस्टबिन लागले नाहीत. गोंदिया रेल्वे स्थानकाच्या बुकिंग कार्यालयासमोर बनविण्यात आलेले बहुपयोगी सुविधा केंद्र (मल्टी फंक्शनल कॉम्प्लेक्स) मागील चार-पाच वर्षांपासून बंदच आहे. एकदा निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र कुणीही इंस्ट्रेस्ट न दाखविल्याने ती प्रक्रियाच रखडली आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावर वॉटर व्हेंडिंग मशिन्स लागणार आहेत. तसे प्रस्तावही मंजूर आहे. मोजक्या रूपयांत तेवढे पाणी या आॅटोमेटिक वॉटर व्हेंडर मशिन्समधून प्रवाशांना मिळणार होते. मात्र या मशिन्स उन्हाळा संपण्याच्या मार्गावर असतानाही लागल्या नाहीत.