शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

सोन्याचा मोह आवरेना

By admin | Updated: February 7, 2015 01:00 IST

सख्खे नातेवाईक आर्थिक अडचणीत मदत करणार नाही. मात्र तुमच्याकडील सोने तुमची साथ देणार, असे नेहमी म्हटले जाते. जीवनातील ही एक वास्तवीकता आहे.

गोंदिया : सख्खे नातेवाईक आर्थिक अडचणीत मदत करणार नाही. मात्र तुमच्याकडील सोने तुमची साथ देणार, असे नेहमी म्हटले जाते. जीवनातील ही एक वास्तवीकता आहे. यामुळेच दाखविण्यासाठी व अडीअडचणीत मदतीसाठी संपत्ती म्हणून नागरिकांकडून सोन्याची खरेदी केली जाते. परंतू अलिकडे सोन्याचा दर चढतच नसल्यामुळे गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणाऱ्यांचा कल बदलला आहे. तरीही सोन्याचे उतरलेले भाव पाहून मध्यमवर्गीयांकडून सोन्याची बारोमास खरेदी केली जात असल्याचे बाजारातील चित्र आहे. सन २०१३ मध्ये ३४ हजारांची उंची गाठणारे सोने आज २८ हजारांच्या घरात आले आहे. मागील वर्षी तर २५ हजारांची घसरण सोन्याला बघावी लागली होती. एखाद्या वस्तूचे भाव उतरल्यास त्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढते व नागरिक जोमात खरेदी करतात. सोन्याच्या बाबतीत तसला प्रकार घडत नाही. सोन्याचे भाव उतरल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी होणार असे वाटत होते. मात्र सोन्याचा व्यवहार होता तसाच सुरू आहे. सोन्याच्या व्यवहारातील वैशिष्ट असे की, सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी भाव उतरणे ही एक खेदाची बाब दिसत आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे आज सोने २८ हजारांच्या घरात आले आहे. अशात आपला बजट बघून मध्यमवर्गीयांकडून खरेदीला जोम आला आहे. तसाही मध्यमवर्गीयांचा गट बारोमासी सोन्याची खरेदी करतो असे सराफा व्यवसायी सचिन बरबटे यांनी सांगीतले. अडीपडीत मदतीसाठी पूंजी म्हणून ते सोन्याला बघतात व जमेल तसे सोने खरेदी करून आपली हौस व संपत्ती बनवित असल्याची वास्तवीकता बाजारातील चित्र बघता नजरेत येते. (शहर प्रतिनिधी)