शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण काढूनच बोडीचे सौंदर्यीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 21:19 IST

शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील बोडीच्या सौंदर्यीकरणाचे काम नगर परिषदेने पुन्हा सुरू केले आहे. मात्र बोडीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून हे अतिक्रमण अगोदर काढा व त्यानंतरच बोडीच्या सौंदर्यीकरणाचे काम करा.....

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : मुख्याधिकाºयांशी चर्चा करून दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील बोडीच्या सौंदर्यीकरणाचे काम नगर परिषदेने पुन्हा सुरू केले आहे. मात्र बोडीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून हे अतिक्रमण अगोदर काढा व त्यानंतरच बोडीच्या सौंदर्यीकरणाचे काम करा अशी मागणी सिव्हील लाईन्स मधील नागरिकांनी केली आहे. यासाठी या नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांची बुधवारी (दि.१७) भेट घेऊन चर्चा केली व त्यांना निवेदन दिले.सिव्हील लाईन्स परिसरातील बोडीची स्वच्छता व सौंदर्यीकरण व्हावे ही प्रत्येक सिव्हील लाईन्सवासींची मागणी आहे. सिव्हील लाईन्स परिसरातील नागरिकांच्या भावना या बोडीशी जुळलेल्या आहेत. यामुळेच शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत या बोडीच्या खोलीकरण व सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यासाठी नगरोत्थान योजनेंतर्गत १.६२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शासनाच्या भूमी रेकॉर्डनुसार खसरा क्रमांक २०६ व २०७ मध्ये ही बोडी आहे. या जागेची मोजणी भूमी अभिलेख विभागाने चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे फक्त खसरा क्रमांक २०६ ज्यामध्ये २.२९ एकर जागा आहे याचीच मोजणी करण्यात आली. तर खसरा क्रमांक २०७ मधील १.३९ एकर जागेची मोजणी न करता चुकीचा अहवाल सरकारला देण्यात आला. या जागेवर अतिक्रमणकर्त्यांनी मलमा टाकून प्लॉट तयार केले व अवैधरित्या त्या जागेची रजिस्ट्री केल्याचे निवेदनात नमूद आहे.परिणामी सुमारे ४ एकर जागेतील बोडी आता फक्त अडीच एकरात उरली आहे. नगर परिषदेने आता बोडीच्या खोलीकरण व सौंदर्यीकरणाचे काम सुरू केल्याने सिव्हील लाईन्स परिसरातील प्रतिष्ठीत नागरीक झलकसिंह बिसेन, मनोहर ठाकूर, ताराचंद तावाडे, नगरसेवक शकील मंसुरी, सुनील तिवारी, क्रांती जायस्वाल आदिंनी मुख्याधिकारी पाटील यांची बुधवारी (दि.१७) भेट घेतली. या भेटीत नागरिकांनी जागेची पुन्हा मोजणी करणे तसेच करण्यात आलेले अतिक्रमण काढूनच बोडीचे काम करावे अशी मागणी केली आहे. एकदा हे काम पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमण काढता येणार नाही. त्यामुळे लागल्या हाती अतिक्रमण काढावे अशी मागणी नागरिकांनी निवेदनातून केली आहे.आताही तीच परिस्थितीसन २००९ मध्ये नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती गोपाल एच. अग्रवाल यांच्या कार्यकाळात वैशिष्टपूर्ण योजनेतून बोडी सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. तेव्हा अग्रवाल यांनी बोडीचे काम सुरू करवून घेतले होते. त्यात बोडी खोलीकरण व सुरक्षा भिंतीचे सुमारे २३ लाख रूपयांचे काम झाले. मात्र अतिक्रमण करण्यात आलेल्या जागेचा विषय घेऊन सुरक्षा भिंतीचे काम अडले. अग्रवाल यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी कारवाई करण्यास सांगीतले होते. मात्र त्या दरम्यान त्यांचा कार्यकाळ संपल्याची माहिती आहे. त्यानंतर आलेल्या अन्य पदाधिकाऱ्यांनी बोडीच्या या विषयाकडे लक्ष दिले नाही. परिणामी बोडीचा विषय एवढे वर्ष पेंडींग होता. आता विद्यमान पदाधिकाऱ्यांनी बोडीचा विषय हाती घेतला. मात्र येथे अतिक्रमणाचा विषय अगोदर सोडविणे गरजेचे होते व ते झाले नाही. परिणामी सन २००९ मध्ये होती तीच परिस्थिती आता ही निर्माण झाली आहे.फौजदारी नियमानुसार कारवाई कराबोडीच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यासाठी नगर परिषदेने यापुर्वीही आदेश काढले होते. पण, पाणी कोठे मुरले व काय झाले कुणास ठाऊक, हे काम मधातच बंद पडले. दरम्यान आता मोठा कार्यक्रम घेऊन गाजावाजा करून बोडीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र आता पुन्हा बोडीच्या जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दा सुटलेला नाही. त्यामुळे यावर कायम तोडगा काढण्यासाठी फौजदारी नियमानुसार कारवाई करा अशी मागणी झलकसिंह बिसेन, मनोहर ठाकूर, ताराचंद तावाडे यांच्यासह सिव्हील लाईन्स परिसरातील नागरिकांनी केली आहे.