शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांच्या दालनाचे सौंदर्यीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 00:43 IST

नगर परिषदेतील नवनिर्वाचित प्रतिनिधींचा कार्यकाळ येत्या ७ तारखेपासून सुरू आहे. त्यामुळे नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या स्वागतासाठी

 फर्निचरचे काम सुरू : पालिकेच्या तिजोरीवर बसणार भुर्दंड गोंदिया : नगर परिषदेतील नवनिर्वाचित प्रतिनिधींचा कार्यकाळ येत्या ७ तारखेपासून सुरू आहे. त्यामुळे नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या स्वागतासाठी त्यांच्या दालनातील फर्नीचरचे काम सुरू झाले आहे. यासाठी सध्याचे फर्नीचर बाहेर वऱ्हांड्यात ठेवण्यात आले असून नव्या फर्नीचरचे काम सुरू असल्याचे दिसते. सोबतच रंगरोगण सुद्धा होत आहे. नव्या कार्यकाळाची ही सुरूवात असली तरी याचा भुर्दंड मात्र पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे. नगर परिषदेच्या निवडणुका आटोपून आता नवनिवार्चितांचा कार्यकाळ ७ तारखेपासून सुरू होत आहे. त्यातही यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आल्याने नगर परिषदेत सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. सर्वाधीक सदस्य व नगराध्यक्ष घेऊन नगर परिषदेत या सर्वांचे आगमन होणार आहे. त्यामुळे नवनिर्वाचितांच्या स्वागतासाठी नगर परिषदेत जय्यत तयारी सुरू आहे. या तयारीत प्रामुख्याने नगराध्यक्षांच्या दालनातील फर्नीचरचे काम सुरू आहे. तसेच इमारतीचे रंगरोगन केले जात आहे. फर्नीचरच्या या कामासाठी दालनातील सध्याचे फर्नीचर बाहेर वऱ्हांड्यात काढून ठेवण्यात आले आहे. तर त्यांची मजा कार्यालयातील चपरासी व कामानिमित्त येणारे घेत आहेत. तसेच नवीन फर्नीचरचे काम तेथेच सुरू आहे. नवे नगराध्यक्ष आता दालनात बसणार असल्याने त्यांच्या मर्जीप्रमाणे हे काम सुरू असल्याचे कळते. तसेही जे-जे नगराध्यक्ष निवडून आले त्यांनी नेहमीच दालनात आपल्या मर्जीने काम करवून घेतल्याची परंपराच आहे. ते काही असो, मात्र गोंदिया नगर परिषदेची आर्थिक स्थिती तशीही बरी नाही. आमदनी अठन्नी व खर्चा रूपय्या अशा स्थितीतून नगर परिषद वावरत आहे. जनरल फंड मध्ये पैसे नसल्याने परिषदेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार होत नाही. तर आताही रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पगार अडून असल्याचे ऐकीवात आहे. अशात मात्र नगर परिषदेत सुरू असलेले हे काम म्हणजे पालिकेच्या तिजोरीवर भुर्दंडच दिसून येत आहे. मात्र यात पालिकेच्या तिजोरीतील जनतेच्या पैशांची उधळण होते असेही आता सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे. (शहर प्रतिनिधी)