शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वेळीच व्हा सावध ! रुग्णवाढीचा दर वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 05:00 IST

जिल्ह्यात मागील वर्षी जून महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला होता. तर जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू होती. मात्र मागील पंधरा दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर रविवारी नऊ कोरोना बाधितांची नोंद झाली. हा गेल्या सहा महिन्यांतील सर्वांत मोठा आकडा होय. तर गोंदिया तालुक्यातील अदासी येथील एका ५५ वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात कोरोना पुन्हा हळूहळू पाय पसरू लागल्याचे चित्र आहे. रविवारी (दि.२) जिल्ह्यात नऊ कोरोना रुग्णांची नोंद झाली तर एका बाधिताचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हावासीयांनी वेळीच सावध होत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा संसर्गाचा वेग पुन्हा वाढून आपणच अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात मागील वर्षी जून महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला होता. तर जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू होती. मात्र मागील पंधरा दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर रविवारी नऊ कोरोना बाधितांची नोंद झाली. हा गेल्या सहा महिन्यांतील सर्वांत मोठा आकडा होय. तर गोंदिया तालुक्यातील अदासी येथील एका ५५ वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने रविवारी एकूण १२३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात १०७ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर १६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ९ नमुने कोरोना बाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ७.३ टक्के आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४७१९४१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात २४७५६१ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २२४५०३ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१७६६४ कोरोनाबाधित आढळले. यापैकी ४०५३० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. आपली सुरक्षा आपल्याच हाती - कोरोना, ओमायक्रॉन पुन्हा डोके वर काढले आहे. रुग्णसंख्येत वाढ होण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरज आहे. आपली आपल्या कुटुंबाची सुरक्षा आपल्याच हाती असून, नियमित मास्कचा वापर, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आदी गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. निर्बंधानंतरही नियमांची ऐसी-तैसी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात जिल्हा प्रशासनाने निर्बंध लागू केले आहे. मात्र या निर्बंधाची सरार्सपणे ऐसी-तैसी केली जात आहे. पर्यटनस्थळे, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या