शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

धाडसी निर्णय घेणारे व्यक्तिमत्त्व ठरले झळके

By admin | Updated: August 10, 2014 23:04 IST

दोन वर्षापूर्वी म्हणजे १८ जून २०१२ रोजी गोंदियाचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळणाऱ्या डॉ.दिलीप झळके यांची बदली नागपूर येथे राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक म्हणून झाली आहे.

नरेश रहिले - गोंदियादोन वर्षापूर्वी म्हणजे १८ जून २०१२ रोजी गोंदियाचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळणाऱ्या डॉ.दिलीप झळके यांची बदली नागपूर येथे राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक म्हणून झाली आहे. जिल्ह्यातील त्यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात अनेक धाडसी निर्णय घेऊन त्यांनी अटीतटीची परिस्थिती आटोक्यात आणली. जिल्ह्यात कायदा व सुवस्था बिघडू न देता त्यावर मात करीत गंभीर प्रकरणांना धैर्याने सांभाळले. राजकारण्यांच्या दबावाला न जुमानता त्यांनी घेतलेले निर्णय महत्वाचे ठरले. जिल्ह्याच्या इतिहासात नववे पोलीस अधीक्षक ठरलेल्या डॉ. झळके यांनी यापूर्वी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम केल्यामुळे त्यांना गोंदिया जिल्ह्यातील नक्षल हालचालींवर करडी नजर ठेवता आली. नक्षलवाद्यांचे कुटील डाव वेळीच हाणून पाडण्यात त्यांना यश आले. सालेकसा तालुक्यातील दोन इसमांचे अपहरण नक्षलवाद्यांनी केले होते. त्यावेळी पोलिसांनी आपले प्राण पणाला लावून त्या दोघांना सकुशल घरी आणले. छत्तीसगडमधील दोन हजारांवर विद्यार्थी, युवक त्यांच्या आंदोलनाचा भाग म्हणून तत्कालीन नागरी उड्डानमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या बंगल्यावर हल्लाबोल करण्यासाठी आले होते. त्यावेळी परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसत होती. परंतु ५०० जणांना वेळीच थोपवून हे प्रकरण शांत करण्यात त्यांना यश आले. शासनाने नक्षलग्रस्त भागासाठी नियुक्ती केली तरी पश्चिम महाराष्ट्रातील अधिकारी गोंदियासारख्या जिल्ह्यात काम करण्यास नकार देतात. गोंदिया जिल्ह्यात बदली होऊनही तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी अनधिकृतपणे गैरहजर राहिलेल्या १७ पोलीस उपनिरीक्षकांना निलंबित करण्याचे धाडस झळके यांनी दाखविले. त्यावेळी त्यांच्यावर महाराष्ट्रातील बड्या नेत्यांचा दबाव आला होता. परंतु त्यांनी त्या दबावाला बळी न पडता निर्णय शासनाचा आहे, मी केवळ अंमलबजावणी करणारा आहे असे नेत्यांना सांगितले. पांढराबोडी येथील अंगणवाडी सेविकेवरील बलात्कार आणि खून प्रकरणात संपूर्ण पोलीस विभाग संकटात आला होता. मात्र दोन दिवसांच्या आतच हा गुन्हा उघडकीस आल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यशवंत गेडाम यांना मारहाण झाली. त्यावेळीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे दिसत होती. परंतु हे ही प्रकरण शांत झाले. शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या सुरक्षा कठड्याला एका ट्रकने धडक दिली होती. त्यावेळी परिस्थिती चिघळण्याची शक्यता होती. परंतु समन्वय घडवून प्रकरण शांत करण्यात आले. गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शास्त्री वॉर्डात एका नवविवाहितेवर पाच नराधमांनी तिच्या पतीसमोर बलात्कार केला होता. या प्रकरणातील आरोपींना अवघ्या दोन तासात पकडण्यात पोलिसांना यश आले. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या कवलेवाडा प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रकार झाल्याने हे प्रकरण चिघळून दुसरे खैरलांजी प्रकरण होऊ पाहात होते. परंतु या प्रकरणातील तथ्य पुढे आणून पोलिसांनी अतिशय संयमीपणे वागत प्रकरणाला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न हाणून पाडला. गुन्हेविषयक घडामोडींना वेळीच उघडकीस आणण्यातही झळके यशस्वी राहिले. त्यांच्या काळात नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया झाल्या नाही. मात्र त्यांनी नक्षलवाद्यांच्या कमांडरसह नक्षलवाद्यांना व नक्षलसमर्थक अशा १४ जणांना आपल्या कार्यकाळात अटक केली. नक्षलवाद्यांनी भुसुरूंग स्फोटासाठी पेरून ठेवलेली स्फोटकं बाहेर काढली. पोलीस प्रशासनात काम करताना शिस्त, गस्त व बंदोबस्त यात कुचराई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. आ.रामरतन राऊत यांच्या सुरक्षेसाठी लावलेले पोलीस ड्युटीवर न गेल्यामुळे दोन पोलिसांना त्यांनी निलंबित केले. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिद वाक्यानुसार त्यांनी जिल्ह्यात आपल्या कामाची पध्दती राबविली. गोंदिया नक्षलग्रस्त आहे. येथे मनुष्यबळाची कमतरता आहे. यासाठी त्यांनी ४८० नवीन जागा भरण्याची मागणी रेटून धरली. ही मागणी पुर्ण करण्याचे पत्र शासनाने त्यांना नुकतेच पाठविले आहे. त्यांनी पोलीस मुख्यालयात अनेक वृक्षांची लागवड केली. त्यातून जंगल भागात नक्षल्यांशी प्रत्यक्ष लढा देण्याचा सराव पोलीसांना येथे करता येणार आहे. त्यांच्या या वृक्षावरील प्रेमामुळेच महाराष्ट्र शासनाने त्यांना वृक्षमित्र पुरस्काराने गौरविले. सन २००४ पासून तयार होत असलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीचे काम पूर्ण केले. इमारत शहीद पोलीस जवानांच्या स्मृतीला उजाळा देत त्या इमारतीचे उद्घाटनही केले.