शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बापरे...गोंदिया जिल्ह्यात २८ हजार नागरिकांनी केले नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 12:33 IST

Gondia News Corona mask मागील सहा महिन्यात गोंदिया जिल्ह्यात एकूण २७ हजार ९०० नागरिकांवर कारवाई करुन ५२ लाख ६१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे१४८ जणांवर फौजदारी कारवाई५२ लाख ६१ लाख रुपयांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शासन आणि प्रशासनाने कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे, गर्दी टाळणे, निर्धारित वेळेत दुकाने सुरू ठेवणे यासाठी नियम तयार केले होते.या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. यातंर्गत मागील सहा महिन्यात एकूण २७ हजार ९०० नागरिकांवर कारवाई करुन ५२ लाख ६१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाटयाने वाढत आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. मात्र यानंतर काहीजण या नियमांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर फौजदारी आणि दंडात्मक कारवाई केली जात आहे. यात प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्कचा वापर न करणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे आदीचा समावेश आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने मागील सहा महिन्यात या विरोधात धडक मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २७ हजार ९०० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करुन ५२ लाख ६१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर १४८ जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नियमांचे पालन करणे नागरिकांना चांगलेच महागात पडले आहे. कोविड संसर्गाच्या काळात दंडत्मक कारवाईतून प्रशासनाला सुध्दा चांगला महसूल प्राप्त झाला आहे.

आठ दिवसात ७६४ जणांवर कारवाईसप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ उंचावल्याने नियम अधिक कठोर करीत राज्याचे गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारण्याचे निर्देश दिले. यातंर्गत मागील आठ दिवसांच्या कालावधी ७६४ जणांवर कारवाई करुन ३ लाख ३८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर व्यावसायीक प्रतिष्ठाने आणि बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया ११ हजार ७५ जणांवर कारवाई करुन ११ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कोविडची माहिती लपविणे पडले महागातकोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याची आरोग्य विभाग आणि नगर परिषदेला माहिती देणे अनिवार्य आहे. होम क्वारंटाईन असणाऱ्यांनी सुध्दा याची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. मात्र बरेच रुग्ण याची माहिती देत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अशा माहिती लपविणाऱ्या ८० रुग्णांना प्रशासनाने नोटीस बजावून १० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून यापैकी ४ जणांनी दंडाची रक्कम भरली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस