शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

बॅँक ऑफ इंडियाच्या एटीएमला ठोकले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 05:00 IST

या कर वसुलींतर्गत पथकाने सोमवारी (दि.१४) एक्सीस बॅँकेच्या एटीएमला सील ठोकले. तर मंगळवारी (दि.१५) सिव्हील लाईन्स परिसरातील बीएसएनएलच्या कार्यालयाला दणका दिला. त्यानंतर बुधवारी (दि.१६) पथकाने पुन्हा कठोरतेने अभियान राबवित शहरातील मनोहर चौकातील बॅँक ऑफ इंडियाच्या एटीएमला सील ठोकले. सन २०१४-१५ पासून त्यांच्यावर एक लाख ८९ हजार ८१२ रूपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. 

ठळक मुद्देकर वसुली पथकाची कारवाई : मोटवानी चेंबरमधील दुकानांवरील कारवाई टळली

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  मालमत्ता कराची थकबाकी न भरल्यामुळे सोमवारी एक्सीस बॅंकेचे एटीएम सील केल्यानंतर बुधवारी (दि.१६) कर वसुली पथकाने मनोहर चौकातील बॅँक ऑफ इंडियाच्या एटीएमला सील ठोकले. सन २०१४-१५ पासून थकून असलेले एक लाख ८९ हजार ८१२ रूपये भरण्यात न आल्याने पथकाने ही कारवाई केली. तर शहरातील मोटवानी चेंबर मधील दुकानदारांनी ऐनवेळी पैसे भरल्याने त्यांच्या दुकानांवरील कारवाई टळली. सुमारे ११ कोटींच्या कर वसुलीसाठी नगर परिषदेचे कर वसुली पथक आता कठोर पावले उचलत आहेत. यातूनच आतापर्यंत इतिहासात कधीच करण्यात आलेल्या सीलींगच्या कारवाया दररोज कुणालाही न जुमानता केल्या जात असल्याचे दिसत आहे. या कर वसुलींतर्गत पथकाने सोमवारी (दि.१४) एक्सीस बॅँकेच्या एटीएमला सील ठोकले. तर मंगळवारी (दि.१५) सिव्हील लाईन्स परिसरातील बीएसएनएलच्या कार्यालयाला दणका दिला. त्यानंतर बुधवारी (दि.१६) पथकाने पुन्हा कठोरतेने अभियान राबवित शहरातील मनोहर चौकातील बॅँक ऑफ इंडियाच्या एटीएमला सील ठोकले. सन २०१४-१५ पासून त्यांच्यावर एक लाख ८९ हजार ८१२ रूपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. त्यानंतर पथकाने शहरातील मोटवानी चेंबरमधील ५ दुकानांचे शटर खाली पाडले होते. मात्र संबंधितांनी थकीत असलेल्या दोन लाख २५ हजार ३२१ रूपयांचा धनादेश दिल्याने या दुकानांवरील कारवाई टळली. तसेच मनोहर चौकातील हॉटेल सेंटर पॉईंट बार व रेस्टॉरंटवर धकड देण्यात आली. मात्र त्यांनीही सन २०१३-१४ पासून थकून असलेल्या एक लाख ४५८ रूपयांचा धनादेश पथकाला दिला. त्यामुळे या हॉटेलवरील कारवाईही ट‌ळली. 

६.६३ लाखांची वसुली कर वसुली पथकाकडून कुणालाही न जुमानता कारवाई केली जात असल्याने शहरातील थकबाकीदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे, पैसा न भरल्यास थेट कारवाई हाच पवित्रा पथकाने घेतल्याने थकबाकीदारांकडून आता पैसे भरून सहकार्य केले जात असल्याचेही दिसत आहे. यातूनच पथकाने बुधवारी सहा लाख ६३ हजार ३९८ रूपयांची मालमत्ता कर वसुली केल्याची माहिती उपमुख्याधिकारी व कर अधिकारी विशाल बनकर यांनी दिली.

 

टॅग्स :atmएटीएमBank of Indiaबँक ऑफ इंडिया