बँकेत जास्त पैसे आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ग्राहकाला बँकेत बोलावून पैसे परत करून त्यांनी आपली विश्वसनियता व माणुसकी जपली. येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची शाखा आहे. सोमवारी (दि.५) ग्राहक प्रतिभा जितेंद्र मेश्राम आपल्या पतीसोबत बचत खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी आल्या होत्या. मजुरी करून जमविलेला पैसा ठेवण्यासाठी गेलेल्या प्रतिभाने जमा पावती भरून रोखपालाकडे पैसे दिले. १० हजार रुपये जमा करून घरी निघून गेले. त्या दिवसाचा आर्थिक देवाणघेवाण बंद करून रोखपाल व व्यवस्थापक यांनी रक्कम जुळविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना एक हजार रुपये जास्तीचे आढळले. त्या दिवसाचे जमा पावती बारकाईने पाहण्यात आली. नोटांच्या तपशिलावरून प्रतिभा मेश्राम यांनी एक हजार जास्तीचे पैसे जमा केल्याचे दिसून आले. प्रामाणिक व विश्वासू अधिकारी म्हणून कार्यरत असलेले बँक व्यवस्थापक एस.एच.सेलूकर, रोखपाल एस. एस. दिवटे यांनी ही बाब आपल्या सहकाऱ्यांना तसेच लोकमतचे प्रतिनिधी अमरचंद ठवरे यांना सांगितली. प्रतिभा मेश्राम व त्यांच्या पती यांना अमरचंद ठवरे यांनी बँकेत बोलाविले. रोखपाल दिवटे यांच्या हस्ते प्रतिभा मेश्राम यांना एक हजार रुपये परत करण्यात आले. बँकेच्या प्रामाणिक कार्यप्रणालीचे ग्राहकांनी कौतुक केले आहे.
बँकेच्या रोखपालाने जास्तीचे पैसे केले परत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:29 IST