शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महागाई विरोधात बैलबंडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:51 IST

जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी (दि.२) वाढत्या महागाई विरोधात उपविभागीय कार्यालयावर बैलबंडी मोर्चा आणि ‘संविधान बचाव- देश बचाव’ रॅली काढण्यात आली. यात शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी बैलबंडीसह सहभागी झाले होते.

ठळक मुद्देसंविधान बचाव देश बचावचा नारा : काँग्रेसने दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी (दि.२) वाढत्या महागाई विरोधात उपविभागीय कार्यालयावर बैलबंडी मोर्चा आणि ‘संविधान बचाव- देश बचाव’ रॅली काढण्यात आली. यात शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी बैलबंडीसह सहभागी झाले होते.मोर्चा निघण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सभा घेण्यात आली. या वेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, माजी जि.प.अध्यक्षा उषाताई मेंढे, माजी जि.प.सभापती पी.जी.कटरे, राजेश नंदागवळी, डॉ. योगेंद्र भगत, पं. स. उपसभापती माधुरी हरिणखेडे, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालिसंग गुलाटी, सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे उपस्थित होते. या वेळी उपस्थितांना संबोधित करताना जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे म्हणाले, जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतात भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खºया अर्थाने लोकशाहीची स्थापना झाली. संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता कायम आहे. मात्र केंद्र व राज्यातील सरकार वारंवार संविधान बदलण्याचे भाष्य करीत आहे. त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. भाजपा सरकार केवळ देशातील जनतेला आश्वासने देवून त्यांची फसवणूक करीत आरोप कोरोटे यांनी केला. वाढत्या महागाई, बेरोजगारी, शेतमालाल कमी दर यासह महत्वपूर्ण समस्यांकडे भाजपाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी शेतकऱ्यांसह सामान्य जनतेची फरफट होत असल्याचे सांगितले.पुरूषोत्त कटरे यांनी सुध्दा भाजप सरकार जोरदार टिका केली. केंद्र आणि राज्यातील विद्यमान सरकारने जनतेला दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. अर्थसंकल्पात देखील केवळ २०१९ मधील निवडणुका डोळ्यापुढे ठेवून घोषणा केल्या. त्या सुध्दा पूर्ण होणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली. उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा या वेळी मार्गदर्शन केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. पेट्रोल व डिझलची दरवाढ, वाढती महागाई, शेतमालाल मिळणारा अल्प दरामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. त्यानंतर मोर्चेकरी बैलबंडीनेच एसडीओ कार्यालयात पोहोचले. कटरे यांच्या नेतृत्त्वात विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले. त्यानंतर मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले. सभेत काँग्रेस नेत्यांनी भाजपावर जोरदार टीका व हल्लाबोल केला. संचालन अपूर्व अग्रवाल यांनी केले व आभार संकेश तिवारी यांनी मानले. यावेळी नगरसेवक राकेश ठाकूर, सुनील तिवारी, भागवत मेश्राम, संदीप ठाकूर, सुशिल रहांगडाले, संकेश तिवारी, शेषराव गिऱ्हेपुंजे, विकास बंसल, देवेंद्र अग्रवाल, गुड्डू ठाकूर, देवा रूसे, संदीप रहांगडाले, नगर कॉग्रेसचे अध्यक्ष बलिजतिसंग बग्गा, सौरभ शर्मा, व्यंकट पाथरू, कुरमराज चौहान, देवा रूसे, भागवत मेश्राम, अ‍ॅड. योगेश अग्रवाल यांचा समावेश होता.