शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बाई गंगाबाई महिला रुग्णालयात पाण्याची समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 22:09 IST

नादुरूस्त बोअरवेलमुळे येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात (बीजीडब्ल्यू) पाण्याची समस्या कायम आहे. मागील सहा महिन्यांपासून यावर तोडगा काढण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले नसून रुग्णांच्या नातेवाईकांची पाण्यासाठी भटकंती कायम असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देरुग्णांच्या नातेवाईकांची भटकंती : प्रशासनाचे हातावर हात

ऑनलाईन लोकमतगोंदिया : नादुरूस्त बोअरवेलमुळे येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात (बीजीडब्ल्यू) पाण्याची समस्या कायम आहे. मागील सहा महिन्यांपासून यावर तोडगा काढण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले नसून रुग्णांच्या नातेवाईकांची पाण्यासाठी भटकंती कायम असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील एकमेव शासकीय महिला व बालरुग्णालय असलेले बीजीडब्ल्यू रुग्णालय नेहमीच विविध कारणांनी प्रसिध्दीत असते. सध्या हे रुग्णालय पाण्याच्या समस्येंने चर्चेत आहे.या रुग्णालयात दररोज शेकडो महिला उपचारासाठी येतात. मात्र मागील सहा महिन्यापासून रुग्णालयाला पाणी पुरवठा होणाºया दोन बोअरवेलमध्ये बिघाड आल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी बोअरवेलची दुरूस्ती करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा तीच समस्या निर्माण झाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची पाण्यासाठी भटकंती कायम आहे. या रुग्णालयात पाणी साठवून ठेवण्यासाठी पाणी टाकीची योग्य व्यवस्था नसल्याने ही समस्या वांरवार निर्माण होत असल्याची माहिती आहे. रुग्णालय प्रशासनाने पाणी टाकी तयार करण्यासाठी एक प्रस्ताव तयार करुन तयार केला असून तो जिल्हा नियोजन समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. या प्रस्तावात ६० हजार लिटरची भूमिगत पाणी टाकी व १५ हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी रुग्णालयाच्या इमारतीवर तयार करण्याची मागणी केली आहे.हा प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकाºयांना देण्यात येणार आहे. रुग्णालयातील पाण्याचा प्रश्न गंभीर असताना व त्यावर नेमकी कुठली उपाय योजना करण्याची गरज आहे हे माहिती असताना सुध्दा रुगालय प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची पाण्यासाठी रुग्णालयाच्या बाहेर भटकंती कायम आहे. हा प्रस्ताव सादर केल्यानंतर प्रशासन यावर काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षबाई गंगाबाई महिला रुग्णालयाचे प्रशासकीय कामकाज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या अतंर्गत येते. या रुग्णालयातील पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी अधिष्ठाता अपूर्व पावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांना बैठकीसाठी बोलविले होते. या बैठकीत त्यांच्यासोबत पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. त्यात पाणी टाकी तयार करण्याचा मुद्दा पुढे आला.रुग्णालयाच्या इमारतीवर १५ हजार लिटर क्षमतेच्या पाणी टाकीचे काम सुरू करण्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिले होते. मात्र पंधरा दिवसांनंतरही या विभागाकडूून कामाला सुरूवात झाली नाही. त्यामुळेच हा प्रस्ताव आता जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात येणार आहे.६० हजार आणि १५ हजार लिटरच्या दोन पाणी टाकी तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात येईल. याच प्रश्नावर जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित केली आहे. त्यात हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.- डॉ. अमरीश मोहबे,वैद्यकीय अधीक्षक बीजीडब्ल्यू.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल