आमगाव : भारतीय जनता पार्टीत सक्षम व बहुजन समाजाचा नेता चालत नाही. ज्यांनी पक्षबांधणी केली, पक्षाला मजबूत केले अशा काम करणाऱ्या माणसाला डावलण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्या भावना दुखावल्या जातात. अशा व्यक्ती दु:खी होऊन आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहे. ही परिवर्तनाची नांदीच आहे, असे उद्गार माजी केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. येथील सरस्वती महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, तर अतिथी म्हणून माजी पालकमंत्री अनिल देशमुख, आ.राजेंद्र जैन, आ.प्रकाश गजभिये, नरेश माहेश्वरी, मधुकर कुकडे, विनोद हरिणखेडे, रमेश ताराम, पंचम बिसेन व विजय शिवणकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांच्यासह टुंडीलाल कटरे, संगीता दोनोडे, सविता बघेले, रज्जु भक्तवर्ती व अनेक कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष तटकरे व खा.पटेल यांनी पुष्पहाराने स्वागत केले. या कार्यक्रमात आमगाव, देवरी, गोरेगाव, सडक-अर्जुनी, मोरगाव-अर्जुनी येथील हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला. त्याचबरोबर कॉग्रेस व इतर पक्षातील पदाधिकारीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. यावेळी भाजपावर टीका करताना खा.पटेल म्हणाले, आता धान पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. चाय पे चर्चा, मन की बात अशआ कार्यक्रमांमधून लोकांना भूलथापा दिल्या जात आहे. १५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आले नाही. लोकांनी मोठ्या आशेने व उत्साहाने केंद्रात व राज्यात सत्ता परिवर्तन केले. मात्र आशा मावळली, उत्साह मावळला आहे. परंतू मी शेतकऱ्यांशी आणि या जिल्ह्यातील नागरिकांशी असलेले नाते तोडणार नाही. येणाऱ्या काळात जिल्ह्यात मोठे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेश माहेश्वरी यांनी तर संचालन बबलु कटरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी/शहर प्रतिनिधी)निवडणुकीसाठी सज्ज व्हाप्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी आमगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश म्हणजे परिवर्तनाची चाहूल आहे. परिवर्तन ही वैचारिक दिशा आहे, असे सांगून विकासाकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसला येणाऱ्या जि.प. व पं.स. निवडणुकीत सत्तेवर आणणे गरजेचे आहे. याकरिता निवडणुकीत यश प्राप्तीसाठी कामाला लागा. आता आपणाला विजय शिवणकरांच्या रुपाने मोठी ताकद मिळाली आहे, असे ते म्हणाले.
भाजपात बहुजनांना स्थान नाही
By admin | Updated: March 23, 2015 01:36 IST