शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पिशव्या पर्यावरणास घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 00:58 IST

रवर्षी होणारी अवैध वृक्षतोड आणि दिवसेंदिवस प्लास्टिकच्या वाढणाऱ्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिगडल्याच्या सूचना...

जनावरांचे आरोग्य धोक्यात : प्लास्टिकच्या बंद पिशव्यात खाद्यपदार्थांची विक्री जोमातलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: दरवर्षी होणारी अवैध वृक्षतोड आणि दिवसेंदिवस प्लास्टिकच्या वाढणाऱ्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिगडल्याच्या सूचना जागतिक स्तराच्या तज्ज्ञांकडून वेळोवेळी प्रसारित करण्यात येत आहे. मात्र प्लास्टीक पिशव्यांवर बंदी घालून पर्यावरणाचा समतोल राखणे शक्य होणार नाही. यावेळी अस्तित्वात असलेल्या खाद्य पदार्थांची पॅकिंग विशिष्ट व सर्व वातावरण सहन करण्याऱ्या सीलबंद प्लास्टिक पिशव्यात केली जाते. या खाद्य पदार्थांची विक्री सर्वत्र जोमात होवून या पिशव्या प्रत्येक ठिकाणी साचतात. गावच्या परिसरात मोठ्याने अस्तव्यस्त पसरल्याचे त्या दिसतात. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्लास्टिक वस्तुचा उपयोग हल्लीच्या काळात मोठ्या जोमाने फोफावला आहे. कोणत्याही ठिकाणी कोणताही समारंभ असो किंवा लग्न सोहळा असो यात मोठ्या प्रमाणात प्लास्टीक वस्तुंची उधळपट्टी करण्यात येते. अल्प काळासाठी उपयोग करुन कुठेही मोकळी जागा दिसली की त्या ठिकाणी या वस्तू फेकून मोकळे होत असतात. शासनाने ५० मॉयकानपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांवर बंदी घातली. मात्र बहुतांश व्यवसायीक जाडीदार ठिसूळ प्लास्टिक पिशव्यांचा वापर करतात. त्या अल्प काळातच जमिनीत मुरुन नाहीशा होत आहेत. मात्र खाद्य पदार्थांच्या पॅकिंगमध्ये येत असलेल्या प्लास्टिक पिशव्या मजबूत, टिकावू व दर्जेदार असल्यामुळे त्या बऱ्याच काळापर्यंत टिकून राहतात. एकदा या पिशवीत खाद्यपदार्थ भरुन पॅकिंग झाल्यावर या पॉकीटमधून थोडीसुद्धा हवा बाहेर निघत नाही. या खाद्य पदार्थांच्या पॉकीटमधून खाद्यपदार्थ खावून उरलेल्या प्लास्टिक पिशव्या चालता फिरता कुठेही फेकल्या जातात. त्यामुळे पाळीव आणि मोकाट जनावरे त्या पिशव्या खावून मोठ्या संख्येने मरण पावल्या आहेत. तर काही प्लास्टिक पिशव्या सांडपाणी वाहणाऱ्या नालीत साचून अडकून राहिल्याचे दिसून येतात. त्यामुळे सांडपाण्याचा निचराही होत नाही.शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. परंतु खाद्यपदार्थांच्या हवाबंद प्लास्टिक पिशव्यांना यातून वगळण्याचे काय कारण असावे, हे संबंधित प्रशासनालाच माहीत? या खाद्य पदार्थांच्या पिशव्या जागोजागी पसरत असल्यामुळे गावचा चेहरा-मोहरा बदलत आहे. पूर्वी बऱ्याच वस्तूंची पॅकिंग टिकावू दर्जेदार प्लास्टिक पिशव्यात केली जात होती. मात्र बऱ्याच उत्पादकांनी पॅकिंगचे प्लास्टिक बदलून कागद मिश्रित प्लास्टिकच्या पॉकिटांचा उपयोग सुरू केला आहे. मात्र सध्या बाजारात व गावागावातील लहान मोठ्या दुकानदाराजवळ खाद्यपदार्थांची विक्री जोमात होत आहे. जनावरांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला असून पर्यावरणाचा श्वासच कोंडल्याचे दिसून येत आहे.