शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात २५ लाखांचे दागिने असलेली बॅग पळविली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 16:45 IST

Gondia News Crime गोंदिया शहरातील गणेश नगर येथील आभूषण ज्वेलर्स दुकानाच्या काऊटंरवर ठेवलेली २५ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग एका अज्ञात आरोपीने पळविली.

ठळक मुद्दे भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ

 लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : शहरातील गणेश नगर येथील आभूषण ज्वेलर्स दुकानाच्या काऊटंरवर ठेवलेली २५ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग एका अज्ञात आरोपीने पळविली. ही घटना गुरुवारी(दि.५) सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

प्राप्त माहितीनुसार गणेश नगर येथे संजय सोनी यांच्या मालकीचे ज्वेलर्सचे दुकान आहे. ते आज सकाळी दुकानात सोन्याचे दागिने असलेली बॅग घेवून दुकानात पोहचले. दुकान उघडल्यानंतर त्यांनी काऊंटरवर सोन्याचे दागिने असलेली बॅग ठेवली. दरम्यान ते पूजा करीत असताना एका तरुणाने त्यांच्या दुकानात प्रवेश करुन दागिने असलेली बॅग उचलून पळ काढला. तो दुकानातून रस्त्य्यावर येताच दुसरा आरोपी मोटारसायकल घेवून दुकानसमोर आला. यानंतर ते दोघेही युवक मोटारसायकलवरुन पसार झाले. या घटनेच्या तपासासाठी शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची चमू कामाला लागली आहे. आभूषण ज्वेलर्सचे मालक संजय दुर्गाप्रसाद सोनी रा. गौशाला वार्ड यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.नागरिकांनो घ्या काळजी शहरात मागील काही दिवसांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सध्या दिवाळीच्या खरेदी निमित्त बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढत आहे. याच संधीचा नेमका फायदा चोरटे घेत आहे. गर्दीची ठिकाणे गाठून मौल्यवान वस्तू व पैसे चाेरुन नेत आहे. त्यामुळे नागरिकांनी सुध्दा बाजारपेठेत खरेदीसाठी जाताना काळजी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी