शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मिनी मंत्रालयात रिक्त पदांचा बॅकलॉग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 21:24 IST

जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची शेकडो पदे मागील तीन चार वर्षांपासून रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या महत्त्वपूर्ण विभागांमध्ये गट ब, क, व ड मधील तब्बल ५३३ पदे रिक्त असल्याने त्याचा कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत आहे.

ठळक मुद्दे५३३ पदे रिक्त : कार्यालयीन कामाजावर परिणाम

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची शेकडो पदे मागील तीन चार वर्षांपासून रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या महत्त्वपूर्ण विभागांमध्ये गट ब, क, व ड मधील तब्बल ५३३ पदे रिक्त असल्याने त्याचा कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत आहे. रिक्त पदांमुळे अनेक फाईल्स अडकल्या आहेत. तर वांरवार फेºया मारुन कामे होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.जिल्ह्यातील ग्रामविकासाची नाळ ही जिल्हा परिषदेशी जुडलेली असते. त्यामुळे जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते. त्यामुळे विविध कामांसाठी येथे नागरिकांची वर्दळ असते. मात्र अधिकारी व कर्मचाºयांची पदे रिक्त असल्याने त्यांची कामे वेळेवर होत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेत गट ‘ब’ चे ७१ पदे रिक्त आहेत. गट ‘क’ चे ४४४ पदे रिक्त असून यातील २७४ पदे सरळसेवा पध्दतीने भरायची आहेत. तर १७० पदे पदोन्नतीने भरायची आहेत. ‘ड’ गटातील १८ पदे रिक्त आहेत. यातील १० पदे सरळसेवा पध्दतीने तर ८ पदे पदोन्नतीतून भरायची आहेत. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचाºयांची पदे रिक्त असलेली गोंदिया जिल्हा परिषद राज्यात एकमेव असावी. त्यामुळे रिक्त पदांचा बॅकलॉग दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रिक्त पदांमुळे येथील कामाकाजावर कसा परिणाम होत आहे. ही बाब त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.जिल्हा परिषदेत रिक्त असलेल्या पदांमध्ये गट ‘ब’ मधील कक्ष अधिकाºयांची २ पदे, लघुलेखक (नि.श्रे.) एक, सहाय्यक लेखा अधिकारी ७, कृषी अधिकारी एक, कनिष्ठ अभियंता शा./अ. ५, विस्तार अधिकारी (शि) वर्ग ३ श्रेणी २ चे २ कर्मचारी, विस्तार अधिकारी (शि) वर्ग ३ श्रेणी ३ चे ९ कर्मचारी, कनिष्ठ सहाय्यक शिक्षक (वर्ग ११ ते १२) २४, केंद्रप्रमुख ९, केंद्रप्रमुख निवडीने २५, वर्ग ५ ते १० साठी माध्यमिक मुख्याध्यापक ७, कनिष्ठ अभियंता ७, कनिष्ठ अभियंता ३ अशी ७१ पदे, गट ‘क’ मधील अधिक्षक २, विस्तार अधिकारी (सा.) १, कनिष्ठ सहाय्यक ३६, वाहन चालक ३, कनिष्ठ लेखा अधिकारी १, वरिष्ठ सहाय्यक लेखा ७, कनिष्ठ सहाय्यक लेखा ७, ग्रामविकास अधिकारी ४, ग्रामसेवक २१, औषध निर्माता ३, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १, आरोग्य पर्यवेक्षक ६, आरोग्य सहाय्यक ५, आरोग्य सेवक (पुरूष) ६५, आरोग्य सेविका १२३, आरोग्य सहाय्यीका महिला ३, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक १४, आरेखक २, कनिष्ठ आरेखक ६, पशूधन पर्यवेक्षक ७, पर्यवेक्षीका ७, निम्नश्रेणी स.अ. (मा.) (५ ते७) ६६, प्राथमिक शिक्षक ४२, प्र.शा. सहाय्यक ७ अशी पदे ४४४ रिक्त आहेत. गट ‘ड’ मधील परिचर १०, हवालदार १, नाईक १, पट्टीबंधक औषधोपचारक ६ अशी १८ पदे रिक्त आहेत.कर्मचारी बिनधास्तजि.प.मध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांना नागपूरचे आकर्षण आहे. येथील कर्मचारी अधिकारी बिनधास्त असून ते नागपूरवरून अप-डाऊन करतात व गोंदियात वास्तव्य असल्याचे प्रमाणपत्र जोडून घरभाडे भत्त्याची उचल करतात. गोंदियात कुणी अधिकारी यायला तयार नाही. त्यामुळे प्रमुख विभागातील अधिकारी नाही. त्यामुळे या विभागात काम करणारे कर्मचारी आपल्या मर्जीनुसार कामे करतात. अनेक कर्मचारी नागपूर, भंडारा, तुमसर व तिरोडा येथून दररोज अप-डाऊन करतात. दुपारी ३ वाजतानंतर जि.प.च्या बहुतांश विभागात शुकशुकाट असतो.प्रगत प्रशासनासाठी रिक्त पद भरणे आवश्यक आहे. जि.प.मध्ये रिक्त पदामुळे कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. संबंधित नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. त्यासाठी रिक्त जागा भरण्याची मागणी महाराष्टÑाच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.-गंगाधर परशुरामकर,विरोधी पक्षनेते, जि.प.गोंदिया.