शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
3
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
4
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
5
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
6
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
7
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
8
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
9
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
10
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
11
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
12
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
13
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
14
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
15
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
16
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
17
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
18
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
19
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
20
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांना बळकटी देणार

By admin | Updated: January 14, 2015 23:10 IST

समाजातील अतिमागासलेल्या अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जमाती आदी समाज घटकांच्या कुटूंबीयांना आजही निवाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यांच्या डोक्यावर सुरक्षित बांधणीसाठी

मुंडीकोटा : समाजातील अतिमागासलेल्या अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जमाती आदी समाज घटकांच्या कुटूंबीयांना आजही निवाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यांच्या डोक्यावर सुरक्षित बांधणीसाठी आर्थिक मदत दिली जाते. मात्र मागील १५ वर्षात या योजनेचा पाहिजे तसा लाभ समाजाला मिळालेला नाही. त्यामुळे आगामी काळात मागास समाजाच्या प्रगतीकरीता मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थाना बळकटी देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याच पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. मुंडीकोटा येथील समता मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या भेटीदरम्यान आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र स्टेट को-आॅप. हाऊसिंग फायनन्स कार्पोरेशन लि. मुंबईचे संचालक मुकुंदराव पन्नासे, धनंजय मोहोकर, गोपीकिशन मुंदडा, भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, माजी आ. हरीश मोरे, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, जि.प. सदस्य तेजेश्वरी भोंगाडे, पं.स. सदस्य संध्या भरणे, गटविकास अधिकारी जमईवार, संतोष चव्हाण, सरपंच निर्मला भांडारकर, उपसरपंच देवेंद्र मंडपे, संस्थेचे अध्यक्ष बुलंद गजभिये, सचिव देवीदास भुतांगे, भाऊराव उके, प्रदिपसिंग ठाकूर, जगदिश अग्रवाल, नंदकुमार बिसेन, मिनू बडगुजर, सविता इसरका, किशोर हालानी, चतूर्भूज बिसेन, मनोज शिंदे, वसंत भेंडारकर, दिनेश मिश्रा, त्रब्यंक खरबीकर, ईश्वरदयाल पटले, सिध्दार्थ गजभिये, महेंद्र डोंगरे, प्रकाश शेडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी धनंजय मोहोकर यांनी, ना. बडोले हे राज्यातील असे पहिले सामाजिक न्यायमंत्री आहेत ज्यांनी मागासवर्गीयांच्या गृहनिर्माण सहकारी संस्थाना प्रत्यक्ष भेट देवून समस्या जाणून घेतल्या. त्यामुळे प्रगतीचे दरवाजे उघडले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच ईश्वरदयाल पटले यांनी केले. यावेळी ना. बडोले यांचा संस्था व हाऊसिंग कॉ.-आॅपरेटीव्हतर्फे शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. राजेंद्र पटले यांनी केले तर आभार राजा बंसोड यांनी मानले. दरम्यान ना.बडोले यांनी वसाहतीची पाहणी करून लाभार्थ्यांशी चर्चा केली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)