शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

जिल्ह्यात ठिकठिकाणी बाबासाहेबांना आदरांजली

By admin | Updated: April 17, 2017 01:08 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.

गोंदिया : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. शाळा, महाविद्यालयांपासून तर अनेक संस्था, संघटनांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. तक्षशिला बुद्ध विहार तिरोडा : येथील तथागत नवयुवक समितीतर्फे तक्षशिला बुद्ध विहारात बाबासाहेबांची जयंती सकाळी सामूहिक बुद्ध वंदना घेवून साजरी करण्यात आली. यानंतर तीन हजार लोकांसाठी पुलाव वाटप कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी शोभायात्रेत सहभागी बांधवांना शरबत व आईसक्रीमचे वाटप संजय जांभूळकर यांच्याकडून करण्यात आले. कार्यक्रमासाठी जयप्रकाश जांभूळकर, संतोष टेंभेकर, जयेंद्र बडोले, सोमेश्वर नंदागवळी, रवी राऊत, प्रशांत शहारे, गुड्डू कडव व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. समर्थ हायस्कूल, चिखली तिरोडा : समर्थ हायस्कूल चिखली येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.एच. ठोंबरे होते. अतिथी म्हणून एस.एस. बिसेन, के.के. सोनवाने, आर.जी. धुर्वे, व्ही.जी. मोटघरे, ए.एस. बघेले, आय.बी. गिऱ्हेपुंजे उपस्थित होते. या वेळी गायत्री चौधरी, स्वाती मेश्राम, पल्लवी पटले या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. तेजस्विनी तिडके व प्रणाली पटले या विद्यार्थिनींनी फुले व बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. या वेळी शिक्षक एस.एच. ठोंबरे, एस.एस. बिसेन, के.के. सोनवाने, आर.जी. धुर्वे, आय.बी. गिऱ्हेपुंजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालन व्ही.जी. मोटघरे यांनी केले. आभार ए.एस. बघेले यांनी मानले. कार्यक्रमासाठी पी.एस. पारधी, ए.एम. राऊत, आर.डी. तिडके, पी.जी. रहांगडाले यांनी सहकार्य केले. बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल तिरोडा : येथील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाबासाहेबांची जयंती केक कापून साजरी करण्यात आली. याप्रसंगी उल्हास टेंभेकर, अ‍ॅड. अश्विन गेडाम, देवानंद शहारे, प्राचार्य विभा गजभिये, सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी देवानंद शहारे यांनी बाबासाहेबांचे जीवन घडविणाऱ्या बुद्ध, कबीर व महात्मा फुले हे तीन गुरू तसेच विद्या, स्वाभिमान व शील हे त्यांचे तीन उपास्य दैवत याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर क्रीडा स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आले. दौड स्पर्धेत नुसरत फरहान खान, अभिधा गजभिये (केजी-१), नैतिक क्षीरसागर (केजी-२), रिजवान खान (पहिली), ओजस मेश्राम (दुसरी); जंपिंग स्पर्धेत लावण्या टेंभेकर (नर्सरी), साहिल बोबडे (केजी-१), कुणाल उके (केजी-२), नैतिक चव्हाण (पहिली), उज्ज्वल फेंडारकर (दुसरी); म्युझिकल चेअर स्पर्धेत प्रिन्स नागदेवे (केजी-१), अनैषा गेडाम (केजी-२), जय शहारे (पहिली), पियूष कोटांगले (दुसरी); स्पून मार्बल्स स्पर्धेत हर्षदा राहुल (केजी-२), श्रृती बागडे (पहिली), पियूष नागपुरे (दुसरी) या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस म्हणून स्मृतिचिन्ह देण्यात आले. यानंतर केक कापून बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना शाळेकडून स्टील डबे भेट स्वरूपात वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य विभा गजभिये, शिक्षिका डोंगरे, बागडे, मेश्राम, भावे, शिक्षकेतर कर्मचारी गजभिये व उके यांनी सहकार्य केले. शरबत वितरण गोंदिया : बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक (गप्पू) गुप्ता यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्या सहकाऱ्यांसह स्थानिक जयस्तंभ चौकाजवळ स्टॉल लावून सकाळ ते संध्याकाळपर्यंत शरबत वितरण केले. यादरम्यान त्यांचे सहयोगी मनोहर वालदे, विनित शहारे, नानू मुदलियार, राजेश कापसे, रमेश कुरील, विनायक खैरे, विनोद पंचबुद्धे, अज्जू अग्रवाल, बबलू पटले, पप्पू पटले, संजू रॉय, प्रीतेश रामटेककर, सचिन मेश्राम, अनिस खान, रौनक ठाकूर, मोन्या मडावी, प्रतिक भरणे, छोटू मेश्राम, सैंकी उमरकर, बबलू बेग, सरोज डोंगरे, रवी विश्वकर्मा, भोजू शिवणकर, कादर कागदी, मुन्नू शुक्ला, वसंत यादव, अज्जू ठाकूर, राजेश पडोले, बबलू भरणे, बाला पिल्ले, सुखदेव हत्तीमारे, मुकेश शेंडे, करण टेकाम, राहुल रोकडे, मनिष नेवारे, अतुल मारचट्टीवार, कमलेश मेंढे, सुभाष ढबाले, जानू मस्के यांनी सहकार्य केले. मनोहरभाई पटेल इंस्टिट्युट आॅफ फार्मसी गोंदिया : मनोहरभाई पटेल इंस्टिट्युट आॅफ फार्मसी येथे प्राचार्य डॉ.नितीन इंदूरवाडे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम पार पडले. प्रास्ताविक प्रा. सुनील चौधरी यांनी मांडले. प्राचार्य इंदूरवाडे यांनी महामानवाच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. संचालन प्रा. अभिषेक पुरोहित यांनी केले. आभार प्रा. कृष्णा खलोदे यांनी मानले. याप्रसंगी प्रा. मनिषा मिश्रा, डॉ. भुमेश वंजारी, प्रा. पूनम भांगे, प्रा. सचिन मोरे, प्रा. आशीष तुरसकर, प्रा. अजय डोंगरवार, प्रा. रिना मस्करे, प्रा. श्रेया खंडेलवाल, प्रा. जहेरा खान, प्रा. शालिनी शिवहरे, धर्मेश पटेल, गोपेश वाजपेयी, मिलिंद मेश्राम, पूजा जांभूळकर, सोनाली ठाकरे, कैलाश