शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महामानवाच्या जयंतीनिमित्त जागृती सप्ताहाचे आयोजन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:27 IST

गोंदिया : सर्वसमाज विचार महोत्सव समिती, संविधान मैत्री संघ आणि समता सैनिक दलाच्या संयुक्तवतीने सम्राट अशोक, क्रांतिसूर्य महात्मा ...

गोंदिया : सर्वसमाज विचार महोत्सव समिती, संविधान मैत्री संघ आणि समता सैनिक दलाच्या संयुक्तवतीने सम्राट अशोक, क्रांतिसूर्य महात्मा फुले, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ८ ते १४ एप्रिल पर्यंत जागृती सप्ताह घर घर जयंती उपक्रम राबविला जात आहे. यात, विविध कला, साहित्य व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या अंतर्गत, ८ एप्रिल रोजी सम्राट अशोक यांच्या जीवन संघर्षावर आधारित ‘बोध कथाकथन स्पर्धा’ आणि ‘प्रश्नोत्तरी’, ९ एप्रिल रोजी ‘कविता वाचन’ स्पर्धा आणि सम्राट अशोक कालीन बौद्ध संस्कृती, हस्तकलेचे वास्तू स्तूप स्मारक या त्यांच्या आयुष्याशी संबंधित दुर्मीळ छायचित्र संग्रह प्रदर्शन, १० एप्रिल रोजी महामानवांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपले कर्तव्य यावर वक्तृत्व कला प्रदर्शन आणि महात्मा फुले यांचा जीवन संघर्ष यांच्या जीवन संघर्षावर आधारित प्रश्नोत्तरी, ११ एप्रिल रोजी देशभक्तीपर, फुले सावित्री भीम बुद्ध महामानव यांचे गीत गायन तसेच महात्मा फुले यांच्या आयुष्याशी संबंधित दुर्मीळ छायाचित्र संग्रह प्रदर्शन, १२ एप्रिल रोजी महामानवाचे कार्य, संविधान जागृती अशा विविध विषयांवर चित्रकला स्पर्धा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्षावर आधारित प्रश्नोत्तरी, १३ एप्रिल रोजी महामानवाच्या जयंती उत्सवात उदो-उदो जयजयकार केल्याने समतावादी समाज निर्माण करणे शक्य किंवा अशक्य या विषयावर निबंध स्पर्धा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याशी संबंधित दुर्मीळ छायाचित्रांचा संग्रह प्रदर्शन तर १४ एप्रिल रोजी रांगोळी दीप सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यात स्पर्धकांनी घरासमोर रांगोळी आणि दीप सजावट करुन आणि महामानवाचे अभिवादन करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर कुटुंबासमवेत फोटो पाठवायचे आहे. वरील स्पर्धा कनिष्ठ आणि वरिष्ठ दोन्ही गटांसाठी आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारातील स्पर्धांचे पुरस्कार प्रदान केले जातील. अधिक माहितीसाठी संविधान मैत्री संघटना संयोजक अतुल सतदेवे यांच्याशी संपर्क साधावा.