शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सतरा वर्षापासून कमिशन देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 22:32 IST

येथे आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहे. या संस्थेचे २००२ पासून ते २०१९ पर्यंतचे धान खरेदीचे कमिशन आदिवासी विकास महामंडळकडे थकीत आहे. मागील १७ वर्षांपासून कमिशन न मिळाल्याने संस्थेची आर्थिक कोंडी होत आहे.

ठळक मुद्देअध्यक्षाची खंत : महामंडळाचा अजब कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : येथे आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहे. या संस्थेचे २००२ पासून ते २०१९ पर्यंतचे धान खरेदीचे कमिशन आदिवासी विकास महामंडळकडे थकीत आहे. मागील १७ वर्षांपासून कमिशन न मिळाल्याने संस्थेची आर्थिक कोंडी होत आहे.बाराभाटी येथील आदिवासी सहकारी संस्था महामंडळाची सब एजन्सी म्हणून काम करते. खरीप आणि रब्बी हंगामात धान खरेदी केंद्र सुरू करुन धान खरेदी करते. यासाठी आदिवासी विकास महामंडळ संस्थेला प्रती क्विंटल करार केलेल्या दरानुसार कमिशन देते.मात्र महामंडळाने मागील १७ वर्षांपासून संस्थेला कमिशन आणि गोदाम भाडे सुध्दा दिले नाही.परिणामी संस्थेची आर्थिक कोंडी झाली आहे. संस्थेचे २००२ पासून खरेदी केलेल्या धानाचे कमिशन २२ लाख ४५ हजार ५७२ रुपये, गोदाम भाडे ११ लाख ७५ हजार ३२२ रुपये, चौकीदार वेतन ५ लाख ७ हजार असे सर्व मिळून ३९ लाख २७ हजार ८९४ रुपये आदिवासी विकास महामंडळाकडे अद्यापही थकीत आहे.मागील सतरा वर्षांपासून थकीत असलेल्या कमिशनसाठी संस्थेने वेळोवेळी महामंडळाकडे पाठपुरावा केला.पण अद्यापही त्याची दखल घेतली नाही. संस्थेच्या थकीत असलेल्या कमिशन संदर्भात विचारणा करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्या नवेगावबांध कार्यालयाचे उपप्रादेशिक व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.मंत्र्यांच्या आदेशालाही खोमहाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी गोंदिया येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पाच महिन्यांपूर्वी बैठक घेतली होती. त्यात संस्थाचे थकीत मागील सर्वच कमिशन देण्याचे मान्य केले होते. मात्र यानंतर महामंडळाने याकडे दुर्लक्ष केले.महामंडळामुळे संस्थेचे नुकसानखरेदी केलेला धान हा दोन महिन्यात उचल करण्याचा महामंडळाचा नियम आहे. पण आदिवासी विकास महामंडळ दोन तीन वर्ष धानाची उचल करीत नाही. परिणामी धान तसाच संस्थेत पडून राहते. त्यामुळे संस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.सतरा वर्षापासून संस्था कमिशनसाठी महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मी नेहमीच वैयक्तिकरित्या संपर्क करुन कमिशन मिळावे म्हणून प्रयत्न करीत आहे. पण अद्यापही कमिश्न देण्यात आले नाही.-तुलाराम मारगायेअध्यक्ष आदिवासी विविध कार्यकारी सेवा संस्था बाराभाटीसंस्थेचे कमिशन न मिळणे ही खूप गंभीर बाब आहे. अनेक प्रकारे कमिशनसाठी शासनाशी महामंडळ भांडत आहे. धानाची घट तुटीचे प्रमाण वाढल्यामुळे भंडारा, गोंदिया, गडचिरोली विभागाचे कमिशन थांबविण्यात आले आहे. लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल.- भरत दुधनागसंचालक आदिवासी विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य, नाशिक

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड