शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

सर्व जाती धर्मांना जोडण्याचे प्रयत्न

By admin | Updated: May 2, 2017 00:29 IST

सामूहिक विवाह सोहळ््याच्या माध्यमातून प्रत्येक पालक आपल्या कन्येच्या कन्यादानाचे पुण्य कमावित आहे.

गोपालदास अग्रवाल : कामठा येथे पार पडला सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा गोंदिया : सामूहिक विवाह सोहळ््याच्या माध्यमातून प्रत्येक पालक आपल्या कन्येच्या कन्यादानाचे पुण्य कमावित आहे. त्यांच्या या पुण्यकार्यात मदत करण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे. यासाठी सामूहिक विवाह सोहळ््याचे आयोजन करीत आहेत. या आयोजनातून सर्व जाती व धर्मांना एक मंचावर आणून जोडण्याचे प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले. कामठा येथे प्रताप मेमोरियल चेरिटेबल ट्रस्टच्या वतीने (दि.२८) अक्षयतृतीयेच्या दिनी आयोजीत सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळ््यात ते बोलत होते. या विवाह सोहळ््याला आ.संजय पुराम, उमा अग्रवाल, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, डॉ. झामसिंग बघेले, अ‍ॅड. के. आर. शेंडे, खिलेश्वरबाबा खरकाटे, प्रेमसागर गणवीर, जि.प.सभापती पी.जी.कटरे, सरपंच कल्पना खरकाटे, गोपालबाबा खरकाटे, गोंदिया-भंडारा जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल, शहर अध्यक्ष अशोक चौधरी, जि.प.सभापती विमल नागपूरे, रमेश अंबुले, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, सभापती हिरालाल फाफनवाडे, आमगावच्या पं.स. सभापती हेमलता डोये, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले उपस्थित होते. आ.अग्रवाल पुढे म्हणाले,या विवाह सोहळ््याच्या माध्यमातून क्षेत्रात एक नवी वैचारीक क्रांती आणण्याचे आमचे प्रयत्न आहे. जोपर्यंत समाजातील प्रत्येक श्रीमंत-गरीब व्यक्ती सामूहिक विवाह सोहळ््याच्या माध्यमातून विवाह करण्याची परंपरा सुरू करीत नाही तोवर हे प्रयत्न सुरूच राहणार आहे. आ.पुराम यांनी, राजकारणासोबतच सामाजीक कार्यात हा सामूहिक विवाह सोहळा महत्वाचा असून सर्व धर्मांना एकाच मंचावर आणण्याची आ.अग्रवाल यांची संकल्पना प्रशंसनीय असल्याचे म्हणाले. शिवणकर यांनी, या विवाह सोहळ््यातून सर्व धर्मीयांना एक मंच मिळाले असून ते आपूलकीच्या भावनेतून या पुण्य कार्यात सहभागी होत असल्याचे मत व्यक्त केले. जि.प.अध्यक्ष मेंढे यांनी, विवाह सोहळ््यांती फिजूलखर्ची रोखण्यासाठी हे आयोजन महत्वाचे असल्याचे मत जिल्हाधिकारी काळे यांनी व्यक्त केले. आ. अग्रवाल यांनी क्षेत्रात विकासकामे आणून विकासाचे राजकारण केले आहे. सोबतच विवाह सोहळ््याच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येत जोडप्यांना परियणसुत्रात बांधण्यात आले, असे पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ म्हणाले. प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष विशाल अग्रवाल यांनी केले. संचालन अपूर्व अग्रवाल यांनी केले. यशस्वीतेसाठी टिकाराम भाजीपाले, बाजार समिती संचालक सावलराम महारवाडे, देवेंद्र अग्रवाल, हुकूमचंद नागपूरे, संतोष घरसेले, संजय अग्रवाल, मुन्ना खरकाटे, लक्ष्मण तावाडे, मिर्ज जमील बेग, रमन लिल्हारे, दिनेश अग्रवाल, झुन्नू खरकाटे, दीपक मालगुजार, आलोक मोहंती, कैलाश अग्रवाल, भूवन सोलंकी, मोनू खरकाटे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)६५ जोडप्यांचे शुभमंगलकामठा येथे पार पडलेल्या या विवाह सोहळ््यात विविध जाती धर्मातील ६५ जोडप्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने ‘शुभमंगल’ करण्यात आले. यात बौद्ध समाजातील जोडपींचा विवाह भंते बुद्धकिर्ती यांनी लावला. तर हिंदू धर्मातील जोडप्यांसाठी चुटे यांनी मंगलाष्टके गायीली. या जोडप्यांना आ. अग्रवाल यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र, ाांड्यांचे सेट, टेबल पंखा व सुटकेस भेट देण्यात आली. ट्रस्टकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. सोलापूरच्या चमूने लावणी सादर केली.