शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

जमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न

By admin | Updated: June 28, 2014 01:08 IST

जमीनीच्या कारणावरून ११ जाणांनी एकाला राड, हॉकीस्टीक व देशीकट्यातील गोळी झाडून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना गुरूवारच्या रात्री १२.३० वाजता दरम्यान शहराच्या रेलटोली येथील गुरूव्दाराजवळ घडली.

गोंदिया : जमीनीच्या कारणावरून ११ जाणांनी एकाला राड, हॉकीस्टीक व देशीकट्यातील गोळी झाडून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना गुरूवारच्या रात्री १२.३० वाजता दरम्यान शहराच्या रेलटोली येथील गुरूव्दाराजवळ घडली.या हल्यात क्रिष्णा सुभाष भांडारकर (३७) रा. टीबीटोली पेट्रोलपंप मागे गोंदिया हे गंभीर जखमी झाले. क्रिष्णा भांडारकर आपला मित्र बाबी मुजुमदार सोबत मोटार सायकलने घरी जात असताना रात्री १२.३० वाजता आरोपी बबलू सैय्यद रा. रामनगर, इब्रान महेफूज खान उर्फ सफीखान रा. टीबीटोली, सत्तू नशिने रा. रामनगर व इतर आठ अश्या ११ जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हॉकीस्टीक व लोखंडी राडने त्यांच्या डोक्यावर मारले. बबलू सैय्यद याने क्रिष्णावर देशीकट्यातून गोळी झाडली. मात्र ती गोळी क्रिष्णाला लागली नाही. रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या क्रिष्णाला उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. सत्तू नशिने याने हा गुन्हा करण्यासाठी इतर दहा जणांना एकत्र आणले होते. असे पोलिसांनी नमूद केले आहे. जमीनीच्या खरेदी-विक्रीत तू पडू नकोस असा सल्ला आरोपी क्रिष्णाला देत होते. परंतु क्रिष्णाने त्यांची न ऐकल्यामुळे त्याचा खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणातील सर्व आरोपी फरार आहेत. सदर प्रकरणातील ११ आरोपींवर रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम १४३, १४४, १४७, १४८, ३०७, १०९ सहकलम ३, २५, २७ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)