शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बँकाकडून कर्जमाफीची माहिती लपविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:49 IST

चावडी वाचनानंतर कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात गुरूवार (दि.२६)पासून कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

ठळक मुद्देजिल्ह्यात पात्र शेतकरी किती : अधिकारीच अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : चावडी वाचनानंतर कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात गुरूवार (दि.२६)पासून कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र शुक्रवारी (दि.२७) दुसºया दिवशीही जिल्ह्यातील किती शेतकºयांच्या बँका खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली. याची माहिती बँकाकडेच उपलब्ध नव्हती. शिवाय ही माहिती लपविण्याचा प्रयत्न बँकाकडून केला जात आहे.राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनंतर्गत शेतकºयांना कर्जमाफी जाहीर करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील ६९ हजार शेतकरी पात्र ठरले. तर ९५ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले होते. बँका आणि सहकार उपनिंबधक कार्यालयाने अर्जांची छाननी व चावडी वाचन करुन यापैकी जेवढ्या शेतकºयांचे अर्ज पात्र ठरले. त्या शेतकºयांच्या बँक खात्यात गुरूवार (दि.२६) पासून कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार होती. चावडी वाचन आणि अर्जांच्या पडताळणीनंतर नेमके किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले, किती शेतकºयांच्या खात्यात दोन दिवसात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली.यासंदर्भातील माहिती जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर बँकेच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता, त्यांनी या संदर्भात सध्या कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. माहिती देण्यासंदर्भात वरिष्ठांकडून निर्देश नसल्याचे सांगितले.एकंदरीत बँकाकडून कर्जमाफीची माहिती देण्यास टाळटाळ करुन माहिती लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर काही बँकाचे अधिकारीच कजमाफीच्या माहितीपासून अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विविध शंकाना पेव फुटले आहे.विभागणीनंतरही समस्यासहकार उपनिंबंधक कार्यालयाने कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या अर्जांची छाननी करुन त्या अर्जांची ग्रीन, येलो, रेड अशा तीन रंगात विभागणी केली. ग्रीन यादीतील अर्ज पात्र, रेड यादीतील अर्ज अपात्र आणि येलो रंगाच्या यादीतील अर्जांमध्ये त्रृट्या असल्याची विभागनी केली होती. मात्र यानंतरही शेतकºयांनी केलेल्या आॅनलाईन अर्जाचे आधार क्रमांक एकसारखे व काही अर्जांमध्ये बºयाच त्रृट्या असल्याची माहिती आहे. अर्जांची छाननी करणाºया आयटी विभागाच्या कर्मचाºयांसमोर सुध्दा अडचण निर्माण झाल्याची माहिती आहे.शेतकरी वाºयावरशासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकºयांना थोडाफार दिलासा मिळाला होता. मात्र आता कर्जमाफीची प्रक्रिया दिवसेंदिवस अधिक किचकट केली जात आहे. त्यामुळे शेतकरी सुध्दा बँका आणि तहसीलकार्यालयाच्या चकरा मारुन हैराण झाले आहे. शेतकºयांना बँकाकडून योग्य माहिती मिळत नसल्याने ते देखील वाºयावर असल्याचे चित्र आहे.