शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

लाच घेताना सहायक वनसंरक्षकास अटक

By admin | Updated: June 8, 2014 23:56 IST

आरामशीन चालविण्यासाठी हप्ते बांधा अन्यथा तुमच्यावर कारवाई करील, अशी धमकी देणार्‍या सहाय्यक वनसंरक्षकास २0 हजाराची लाच घेताना भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या

भंडारा एसीबीची कारवाई : मागितले होते ४0 हजारसडक/अर्जुनी : आरामशीन चालविण्यासाठी हप्ते बांधा अन्यथा तुमच्यावर कारवाई करील, अशी धमकी देणार्‍या सहाय्यक वनसंरक्षकास २0 हजाराची लाच घेताना भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे.ही कारवाई शनिवारच्या रात्री ९.५0 वाजता करण्यात आली.सडक/अर्जुनी येथील  सुभाष साँ मिल चे मालक लोकेश सुभाष बारसागडे (३८) यांनी या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथे जाऊन तक्रार केली. त्यांची स्वत:च्या सुभाष नावाने आरामशीन आहे. त्यांच्या आरामशीनमध्ये सडक अर्जुनी परिसरातील फर्निचर दुकानदारांची लाकडे कापले जातात. ५ जून २0१४ रोजी ते आपल्या आरामशीनमध्ये असताना  वनविभाग गोंदियाचे सहाय्यक वनसंरक्षक बिश्‍वास हे दुपारी त्यांच्या आरामशीनमध्ये आले. आपल्याकडे सडक अर्जुनी परिसरातील १७ ते १८ फर्निचर दुकानदार लाकडाची कटाई होते. सर्व दुकानदार हे दोन नंबरचे लाकडे आणून कटाई करीत आहेत. प्रत्येक दुकानदाराकडून प्रत्येकी २000 रुपये व तुम्ही ५000 रुपये असे एकूण ४0000 रुपये अवैध धंदे चालू  ठेवण्याकरीता मला द्यावे लागतील. अन्यथा फर्निचर दुकानदारांवर व तुमच्यावर विनापरवाना लाकडे कटाई करीत असल्याचा ठपका ठेऊन तुमच्या आरामशीनवर कारवाई करील, अशी धमकी दिली. त्यावर सुभाष म्हणाले फर्निचर दुकानदार गरीब आहेत. ते दोन नंबरचे लाकडे आणित नाही. त्यामुळे एवढे पैसे आपणास देवू शकत नाही. त्यावर  बिश्‍वास यांनी म्हणाले, जर ४0 हजार रुपये दिले नाही तर आपल्यावर कारवाई करावी लागेल अशी धमकी दिली.त्यानंतर सुभाष बारसागडे यांनी या संदर्भात तक्रार  भंडाराच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीनुसार सापळा रचण्यात आला. यात ४0 हजारापैकी २0 हजार रूपये लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी  सहाय्यक वनसंरक्षक वर्ग-१ तपन चेतन्य बिश्‍वास (५३) याने आपल्या पदाचा दुरूपयोग करून भ्रष्ट मार्गाने स्वत:चे फायद्याकरीता तक्रारदारांकडून मागणी केली. ४0 हजार रुपये पैकी तडजोडीनंतर २0 हजार रुपये सुभाषने आपल्या आरामशीन सडक अर्जुनी  येथे दिनांक दिले. याचवेळी सापळा रचलेल्या अधिकार्‍यांनी त्याला अटक करून आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात डुग्गीपार कलम ७,१३(१)(ड) सहकलम १३(२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ अन्वये रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली. आरोपी जवळून २0 हजार रुपये हस्तगत करण्यात आले. आरोपी तपन बिश्‍वास हा सन १९९0 साली आर.एफ.ओ. म्हणून नियुक्त झाले. सन २0१२ मध्ये सहाय्यक वनसंरक्षक या पदावर पदोन्नती झाली. तेव्हा पासून वनविभाग कार्यालय गोंदिया येथे कार्यरत आहेत. सदर कारवाई  एसीबी नागपूरचे पोलीस उपायुक्त वसंत शिरभाते,  पोलीस उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर पर्वते , उपाध्याय, अशोक लुलेकर, भाऊराव वाडीभस्मे, गौतम राऊत, सचिन हलमारे, पराग राऊत, अश्‍विनकुमार गोस्वामी, मनोज पंचबुद्धे, शेखर देशकर, महिला शिपाई कंगाले, चालक मनोज चव्हाण यांनी केली. (शहर प्रतिनिधी)