देवरी : अन्याय व अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या आदिवासी समाजाच्या वीरांगणा राणी दुर्गावती व क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी बंड पुकारून अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि देशात एक इतिहास घडविला. अशा वीरांगणा व क्रांतिवीरांचे विचार आत्मसात करून सर्व समाजबांधवांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे मत आमदार सहषराम कोरोटे यांनी व्यक्त केले.
देवरी तालुक्यातील ओवारा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या चांदलमेटा या अतिदुर्गम गावात राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले. ओवाराचे सरपंच हिरामन टेकाम, उपसरपंच कमल येरणे, प्रतिष्ठित नागरिक टिकाराम आचले, श्यामलाल उईके, ग्यानीराम वलके, कैलास वलके, डोये, गोपीचंद मरस्कोल्हे, जितू सलाटे, महेश वलके उपस्थित होते. गोपीचंद मरस्कोल्हे यांनी प्रास्ताविक केले, तर टिकाराम आचले यांनी संचालन केले आणि कैलास वलके यांनी आभार मानले.