शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अद्याप सापडले नाही मारेकरी

By admin | Updated: July 16, 2015 01:38 IST

येथील एका व्यापाऱ्याच्या पत्नीची हत्या होऊन सहा दिवस उलटले. मात्र अद्यापही मारेकऱ्यांचा शोध लागला नाही.

दरोडा व हत्या : महिला वर्गात दहशतीचे वातावरणअर्जुनी मोरगाव : येथील एका व्यापाऱ्याच्या पत्नीची हत्या होऊन सहा दिवस उलटले. मात्र अद्यापही मारेकऱ्यांचा शोध लागला नाही. पोलीस यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. मारेकऱ्यांचा शोध न लागल्यामुळे महिला वर्गात दहशत कायम आहे.येथील इलेक्टॉनिक्स वस्तुंचे व्यापारी सुरेश पशिने यांच्या पत्नी नितू यांची अज्ञात मारेकऱ्यांनी ९ जुलै रोजी त्यांच्या घरी भरदिवसा हत्या केली. या हत्येचा उलगडा करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. हत्या उघडकीस आल्याक्षणीपासूनच पोलीस यंत्रणा कामाला लागली. अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने, ठाणेदार अभिषेक पाटील, सहा. पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप साळुंखे तसेच स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया व बाहेरुन आलेल्या पोलीसांच्या चमू येथे तपासकामात व्यस्त आहेत. तपासाच्या विविध पैलूंचा वापर करीत मारेकऱ्यांचा शोध लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अद्यापही मारेकरी गवसले नाहीत.अर्जुनीत अशा घटना घडू नये तसेच मारेकऱ्यांना अटक व्हावी यासाठी व्यापारी संघटनेतर्फे १० जुलै रोजी तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मृतक नितूची हत्या नेमकी कशासाठी झाली हे गुढ अद्यापही कायम आहे. या हत्येचा सुगावा लागावा यासाठी गोंदिया येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाने सानगडी व लाखांदूरकडे जाणाऱ्या टी प्वार्इंटपर्यंतचा मार्ग दर्शविला.श्वान त्यापुढे गेला नाही.रविवारी (दि.१२) खा. नाना पटोले यांनी मृतकाचे कुटुंबियांचे सांत्वन केले. तपासासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांश्ी चर्चा केीली व मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देश दिले. २-३ दिवसात शोध लागण्याची शक्यता असल्याचे खा. पटोले यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले. या मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी मात्र अद्याप भेट दिली नाही. रविवारी ते सडक अर्जुनी येथे पंचायत समिती सभापती- उपसभापती निवडणुकीदरम्यान उपस्थित असल्याचे समजते. (तालुका प्रतिनिधी)