शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

‘भक्त प्रल्हाद’ नाटकातून कलावंतानी पाडली कलेची छाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 21:52 IST

आज सगळ्याच क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसून येत आहे. माणूस हा छंदप्रिय आहे. आपली जबाबदारी इमाने ईतबारे सांभाळूनही आपला छंद जोपासण्यास कोणतीही उणिव भासू देत नाही.

ठळक मुद्देहौशी महिला कलाकार : पौराणिक नाटकातून अभिनय सादर

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : आज सगळ्याच क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसून येत आहे. माणूस हा छंदप्रिय आहे. आपली जबाबदारी इमाने ईतबारे सांभाळूनही आपला छंद जोपासण्यास कोणतीही उणिव भासू देत नाही. समाजाचा पांठीबा सोबतीला असल्याने ताडगाव येथील हौसी महिला कलाकार आज पुढे येवून आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना रिझवून सोडतात. ताडगावच्या महिला नाट्य कलाकारांनी ‘भक्त प्रल्हाद’ या पौराणिक नाटकाचा नुकताच प्रयोग सादर केला.अशोक चांडक यांच्या आवारात सदर नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे व जि.प.सदस्य मंदा कुंभरे यांच्या उपस्थितीत इंजिनिअर आनंदकुमार जांभुळकर यांच्या हस्ते करण्यात आले. ताडगावच्या हौशी कलाकार महिला सिंहाचा छावा, सैतानी पाश, सोन्याची द्वारका, स्वर्गावर स्वारी या ऐतिहासीक नाटकाच्या प्रयोगातही अभिनयाची साथ करुन नाट्य प्रयोग सादर केले.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ताडगाव हे गाव नाटकाचे केंद्र समजले जाते. गावात नाट्य कलाकारांची खाण आहे. वर्षातून कित्येकदा नाटकांचे प्रयोग सादर केले जातात. विशेष म्हणजे महिला नाट्य कलाकारांची देण गावाला लाभली आहे. आज महिलांना नाटकामध्ये काम करताना समाज व कुटूंबाचा विरोध काही वेळा जाणवतो.परंतु ताडगाव येथे तशी मानसिकता दिसून नयेत नाही. उलट महिलांनी आपल्या अभिनयाची अप्रतिम छाप समाजापुढे पाडावी या हेतूने घरचा माणूस सुद्धा पत्नीला पाठींबा देऊन प्रोत्साहित करतो. यामुळे येथील महिला नाट्य कलाकार नाटकाचे सादर करणासाठी बाहेरगावी जावून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत.नाटकाचे सादरीकरण करण्यासाठी माणिक नाकाडे, अरविंद नाकाडे, सुनील नाकाडे यांची साथ मिळत आहे. झाडीपट्टीतील महिला आज नाट्यभूमीत शहरी कलावंतांच्या मागे नाही हे ताडगावच्या महिला नाट्यकलाकारांनी दाखवून दिले.