शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कृत्रिम गुडघा फुलवू शकतो त्याचे जीवन

By admin | Updated: June 27, 2016 01:54 IST

शाळेतून घरी परतताना झालेल्या अपघातात डावा पाय गमावून बसला. पायाने अपंग झालेल्या त्या तरुणाने म्हाताऱ्या

 आर्त हाक : वृद्ध मातेचा आधार बनण्याची त्याची धडपडगोंदिया : शाळेतून घरी परतताना झालेल्या अपघातात डावा पाय गमावून बसला. पायाने अपंग झालेल्या त्या तरुणाने म्हाताऱ्या आईला आधार देण्यासाठी पैसे कमविण्याची इच्छा जाहीर केली. अपंगत्वावर मात करण्यासाठी त्याने कृत्रीम गुडघा बसवून दोन पैसे कमविण्याची तयारी करणाऱ्या तरुणाकडे ५५०० रूपये कमी असल्याने त्याला कृत्रीम गुडघा बसवून न देता जयपूर वरून परत पाठविण्यात आले. कृत्रीम गुडघ्या बसविण्यासाठी लागणाऱ्या मदतीसाठी तो अपंग शासन दरबारातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मदतीची याचना करीत आहे.दत्ता किशन राऊत (३५) रा. झोपडपट्टी क्रं. ९ रेल्वे स्टेशन हनुमान मंदिराजवळ गोंदिया असे त्या मदत मागणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दत्ता पाचवीत असताना शाळेतून घरी परत येत होता. त्यावेळी भरधाव धावणाऱ्या ट्रकखाली त्याचा पाय आला. अपघातात त्याचा पाय चकनाचूर झाला. या अपघाताचा जबरधक्का दत्ताच्या वडीलाला बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. पतीचे निधन व मुलाचा अपघात या दोन्ही घटनांतून सावरणे कठिण होते. तरी देखील पती नसण्याचे दुख व चिमुकल्या मुलाने अपघातात गमवलेला पाय याचे दु:ख पचवून त्याच्या आईने मोलमजूरी करून दत्ताचे संगोपन केले. आज दत्ता ३५ वर्षाचा वयोगटात आहे. आई म्हातारी झाली आहे. आता आईला काम जमत नसल्याने आपण आईचे पालन पोषण करावे, यासाठी दत्ताने एका टेलरकडे काच बटन लावण्याचे काम शिकले. त्याला शिवणकामातून दोन पैसे कमविता यावे, यासाठी त्याने कृत्रिम गुडघा बसविल्यास त्याला शिवणकाम करून दोन पैसे मिळू शकतात. यासाठी त्याने कृत्रिम पाय बसविण्यासाठी दत्ताने लोकवर्गणीतून २० हजार गोळा करून जयपुर येथील डॉक्टरांना कृत्रिम पाय बसविण्याची विनंती केली. परंतु ५ हजार ५०० रुपये कमी असल्याचे सांगून उर्वरीत पैसे आणण्यासाठी डॉक्टरांनी त्याला कृत्रिम पाय बसवून न देता पुन्हा परत पाठविले आहे. घरात अठराविश्वे दारिद्र असतानाही त्याने कुणाकडे हात पसरविले नव्हते. परंतु लहानपनातच वडीलांच्या निधनानंतर आईने मोलमजुरी करून सांभाळ केला. परंतु म्हाताऱ्या आईला आता काही जमत नसल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने स्वयंरोजगार करण्याचा चंग बांधला. परंतु पायाला चालता येत नाही म्हणून कृत्रिम पाय बसवून शिवणकाम करण्याचा त्याचा माणस त्याचा असल्याने त्याने कृत्रिम पाय गुडघ्यापासून वाकणारा असावा असे त्याला वाटले. त्यातून त्याने गुडघ्यापासून वाकणारा कृत्रिम पाय बसविण्यासाठी लागणारे पैसे गोळा केले. जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. चंद्रकांत पुुंलकुंडवार व जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी आपल्या सोईनुसार मदत केली. त्याने काही दिवसापूर्वी २० हजार रुपये गोळा करून मदत गोळा करून कृत्रिम पाय बसविण्यासाठी तो आईला घेऊन जयपुरला गेला. तेथील डॉक्टरांना २० हजार रूपये देऊन कृत्रीम पाय पसविण्याची विनंती केली. परंतु हा कृत्रिम पाय २५ हजार ५०० रुपयात येत असल्याचे सांगून डॉक्टरांनी त्याला परत पाठविले. उर्वरीत ५ हजार ५०० रुपयासाठी धडपड करीत आहे. कृत्रिम पाय बसवून आपण रोजी रोटीचा प्रश्न मिटवावा, अशी अपेक्षा उराशी बाळगून जयपुर येथे पाय बसविण्यासाठी गेलेल्या त्या तरूणाला पैसे कमी असल्यामुळे परत पाठविण्यात आले. गोंदियात परतलेल्या दत्ताने काही मदत मिळते का यासाठी जिल्हा परिषदेत जाऊन मदतीची याचना केली. परंतु आज त्याला प्रतिसाद न मिळाल्याने त्याने ज्यांच्याकडून मदत म्हणून जे पैसे घेतले ते पैसे परत करण्याचा माणस बांधला. कृत्रिम पाय बसविण्यासाठी आपण केलेल्या मदतीला पुर्णत्वास नेण्यास मदत करा अन्यथा मदत म्हणून दिलेले पैसे परत घ्या, अशी विनवणी तो अधिकाऱ्यांना करतांना दिसला. सामाजिक संस्था, समजोपयोगी काम करणाऱ्यांनी दत्ताला फक्त ५५०० रूपये मदतीची गरज असल्याने त्याला मदत केल्यास त्याचे जीवन फुलू शकते. आपल्या म्हाताऱ्या आईला चांगले दिवस दाखविण्याचे त्याचे स्वप्न आहे. (तालुका प्रतिनिधी)