शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अरततोंडीची बोअरवेल परसटोलाने पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2017 01:42 IST

चौदाव्या वित्त आयोगाच्या फंडामधून परसटोला, धमदीटोला व अरततोंडी या तिन्ही गावांमध्ये प्रत्येकी एकेक बोअरवेलचे खोदकाम करणे अनिवार्य होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : चौदाव्या वित्त आयोगाच्या फंडामधून परसटोला, धमदीटोला व अरततोंडी या तिन्ही गावांमध्ये प्रत्येकी एकेक बोअरवेलचे खोदकाम करणे अनिवार्य होते. नमूद ठरावानुसार परसटोला व धमदीटोला या दोन्ही गावांत खोदकाम करण्यात आले. परंतु अरततोंडी येथे बोअरवेल मशीन येवूनही ग्रामस्थांना कसलीही विचारपूस न करता परसटोला येथे नेवून खोदकाम करण्यात आले.परसटोला गावाचे नाव ठरावामध्ये नमूद नसतानासुद्धा तेथे बोअरवेल खोदकाम करण्यात आले. हे काम चुकीचे आहे, असे कळल्यानंतर काही वेळाने अरततोंडी ग्रामस्थांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाची सरपंच, सचिव व अरततोंडी येथील सदस्य यांना विचारणा केली असता याबाबद आम्हाला काहीच माहिती नाही, असे उत्तर मिळाले. शासनाच्या निकषाप्रमाणे ठरावामध्ये नमूद असल्याप्रमाणे काम करणे अनिवार्य आहे. प्रोसेडिंग रजिस्टरमध्ये अरततोंडी येथे नमूद केलेल्या ठिकाणी बोअरवेल खोदकाम करणे अपेक्षीत होते. परंतु तसे झाले नाही. १ मे रोजी घेतलेली सभा तहकुब झाली ती तहकुब सभा १६ मे रोजी सकाळी ११.३० वाजता घेण्यात आली. अरततोंडी ग्रामवासीयांनी या कामाची दखल घेण्यासाठी १२ मे रोजी ग्रामपंचायतला अर्ज दिला. त्यामध्ये सभेच्या विषयसूचीचे वाचन झाले व शासकीय परिपत्रकाचे वाचन झाल्यानंतर भावेश खुशाल डोंगरे यांनी त्यांच्या घरासमोर झालेल्या बोअरवेलच्या कामाचे अर्ज दिले. तो विषय ग्रामसभेच्या सभेमध्ये कोणतीही सूचना मांडण्याची इच्छा असल्यास सभेच्या कमीत कमी दोन दिवसा आधी अर्ज सादर करणे आवश्यक आहे, असे प्रसिद्ध केलेल्या सभेच्या नोटीसवर लिहिले आहे. पण सभेच्या शेवटी अर्ज स्वीकारुन तो विषय सभेमध्ये चर्चेत आणून हात वर करुन पारित करण्यात आला. ग्रामपंचायत नियमानुसार तहकुब झालेल्या सभेमध्ये दुसरे विषय घेता येत नाही आणि त्यांना मंजुरीसुद्धा देत येत नाही. तरी या झालेल्या चुकीच्या कामाची चौकशी करुन आपल्या मनमर्जीने काम करणाऱ्यांवर कारवाई करावी व ठरावामध्ये नाव नसूनसुद्धा तेथे बोअरवेल स्वमर्जीने तयार केले, त्याचे पैसे त्यांनीच भरावे. ते पैसे ग्रामपंचायतने दिले तर ग्रामपंचायतला जबाबदार धरुन दोषी ठरविण्यात येईल. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा अरततोंडी येथील संपूर्ण गावकरी आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.