लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : चोरी, घरफोडीच्या प्रकारणात सराईत असलेल्या दोघांना १९ डिसेंबर रोजी गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी नागपूरातील आहेत.गोंदिया शहराच्या गौतमनगराच्या बाजपेयी वॉर्डातील शालीनी सतीश बावनथडे (२९) यांच्या घरून ११ ते १२ डिसेंबरच्या रात्री दरम्यान ५४ हजार २०० रूपयाचे सोन्याचे दागिने पळवून नेले होते. या प्रकरणात गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या चमूने तपास करून दोन आरोपींना जेबंद केले. नागेश गोपीचंद शहारे (४०) रा.जरीपटका पोलीस स्टेशनसमोर कब्रस्तानजवळ विश्वासनगर, नागपूर व सिध्दार्थ उर्फ लादेन पंजाबराव गजभिये (३०) रा.शिवनकर नगर झोपडपट्टी खरबी नाका नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपी नागेश शहारे हा मूळचा गोंदियाच्या गौतमनगरातील रहिवासी आहे. नागेशवर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात चोरी घरफोडीचे २० गुन्हे दाखल आहेत. तर सिद्धार्थ गजभिये याच्यावर नंदनवन नागपूर पोलीस ठाण्यात १६ गुन्हे दाखल आहेत. हे दोन्ही सराईत आरोपी आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, पोलीस हवालदार राजू मिश्रा, सुबोध बिसेन, जागेश्वर उईके, संतोष बोपचे, छगन विठ्ठले यांनी केली आहे.
दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST
गोंदिया शहराच्या गौतमनगराच्या बाजपेयी वॉर्डातील शालीनी सतीश बावनथडे (२९) यांच्या घरून ११ ते १२ डिसेंबरच्या रात्री दरम्यान ५४ हजार २०० रूपयाचे सोन्याचे दागिने पळवून नेले होते. या प्रकरणात गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या चमूने तपास करून दोन आरोपींना जेबंद केले.
दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक
ठळक मुद्देशहर पोलिसांची कारवाई : दोन्ही आरोपी सराईत चोरटे