शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यात अडकलेल्या मजुरांना परत आणण्याची व्यवस्था करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

परराज्यात आणि जिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले मजूर ‘लॉकडाऊन’मुळे तिथे अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी त्यांना जिल्ह्यात परत आणून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.२४) आढावा घेताना अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देखासदारांचे निर्देश। जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : परराज्यात आणि जिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले मजूर ‘लॉकडाऊन’मुळे तिथे अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी त्यांना जिल्ह्यात परत आणून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.२४) आढावा घेताना अधिकाऱ्यांना दिले.कोरोनाबाबत गोंदिया जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार नेते यांनी शुक्रवारी (दि.२४) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, देवरीचे तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, भाजयुमोचे प्रदेश सदस्य हितेश डोंगरे उपस्थित होते. यावेळी खासदार नेते यांनी कोरोना परिस्थितीबाबत माहिती घेतली. जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी माहिती देताना, परराज्य व बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. लक्षणे आढळलेल्या नागरिकांचे कोरोना तपासणीसाठी नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. तसेच बाहेरील नागरिकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगीतले. तसेच रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबांना रेशनचा पुरवठा करण्यात येत आहे. रेशनकार्ड धारकांना शासनातर्फे मोफत धान्य वाटप सुरु आहे. ९२५ नागरिक क्वारंटाईनमध्ये असून ५५ नागरिकांचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविल्याचेही सांगीतले. यावेळी अंजनकर यांनी सालेकसा तालुक्यातील ग्राम बोगाटोला येथे १५ मुस्लीम कुटुंबाना धान्य मिळत नसल्याची बाब लक्षात आणून दिली. यावर खासदार नेते यांनी त्या कुटुंबाना त्वरीत अन्नधान्याचा पुरवठा करण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी त्यांना धान्याचा पुरवठा करण्यात येईल असे सांगितले. ‘लॉकडाऊन’बाबत माहिती विचारली असता पोलीस अधीक्षक शिंदे यांनी संपूर्ण जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ व्यवस्थित सुरु असून विनाकारण फिरणाºया वाहनधारकांवर कारवाई केली जात असल्याचे सांगितले.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेतेcollectorजिल्हाधिकारी