शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अर्पितच्या मारेकऱ्यांना २४ तासांत अटक, रामनगरच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

By नरेश रहिले | Updated: November 14, 2023 20:20 IST

चाय शाय बार दुकाना समोर घडली होती घटना

नरेश रहिलेगाेंदिया : दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तिघांनी अर्पित ऊर्फ बाबू ओमप्रकाश उके (२३) रा. आंबाटोली, गोंदिया या तरुणाला धारदार शस्त्राने भोसकून ठार केल्याची घटना १२ नोव्हेंबरच्या रात्री ११:१५ वाजता दरम्यान घडली. या प्रकरणातील आरोपींना रामनगरच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने २४ तासात अटक केली.अटक करण्यात आलेल्या आरोपीत हर्ष छवींद्र वाघमारे, रा. कुडवा, अंकज सोहनलाल राणे उर्फ राणा, रा. डब्लींग कॉलनीजवळ गोंदिया व प्रवीण सुनील मुटकुरे रा. रेल्वे स्टेशन समोर, रेलटोली गोंदिया यांचा समावेश आहे. १२ नाेव्हेंबर रोजी राहुल राजू डाहाट (२४) रा. दीनदयाल वाॅर्ड रामनगर गोंदिया व त्याचा मित्र अर्पित ऊर्फ बाबु ओमप्रकाश उके (२४) रा. आंबाटोली गोंदिया हे पाल चौक ते गुरुद्वारा रस्त्याने जात असताना चाय शाय बार समोर रात्री ११:१५ वाजता मोटारसायकलने कट मारल्याच्या कारणावरून आरोपींसोबत वाद झाला.या वादात हर्ष, अंकज व प्रवीण या तिघांनी अर्पित उके याच्यावर चाकूने वार करुन ठार केले. राहूल डहाट याला फरशीच्या तुकड्याने मारुन जखमी केले. खून करून पसार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी रामनगर पोलिस रवाना झाले होते. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजने यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता गुन्ह्याच्या तपासा संदर्भात पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना मार्गदर्शन करून आरोपीचा तत्काळ शोध घेऊन गुन्ह्यात अटक करण्याच्या सूचना केल्या होत्या. ठाणेदार संदेश केंजळे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या मदतीने गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासात आरोपींना अटक केली.यांनी केली कारवाईही कारवाई रामनगरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू बस्तावडे, पोलिस हवालदार राजेश भुरे, सुनीलसिंह चव्हाण, जावेद पठाण, छत्रपाल फुलबांधे, आशिष अग्निहोत्री, पोलिस नायक बाळकृष्ण राऊत, पोलिस शिपाई कपिल नागपुरे यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी