लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा जोतिबा फुले हे एक भारतीय विचारक, समाजसेवक, लेखक, आणि क्र ांतिकारी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या याच कार्याने त्यांना महात्मा बनवलं. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली आणि अनेक अडथळे पार करत त्यांनी महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले. जोपर्यंत समाज शिक्षित होणार नाही तोपर्यंत हा देश पुढे जाऊ शकत नाही असे त्यांचे मत होते. अशातूनच देशाची पहिली महिला शिक्षिका त्यांनी आपल्याला दिली. महात्मा फुले हे असे पुष्प आहे, ज्यांच्या विचारांचा सुगंध अनंतकाळापर्यंत दरवळत राहील असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम बलमाटोला येथील मरार समाज कल्याण समितीच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १६२ व्या पुण्यतिथीपर आयोजीत कार्यक्र मात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उदघाटन रामराव खरे, दीपप्रज्वलन शामकला पाचे आणि रंगमंच पूजन डॉ. प्रकाश देवाधारी यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून इशुलाल कहनावत, कला बाम्बरे , नोकलाल कहनावत, राजकुमार म्हात्रे, धुमाळ, मुकेश पाचे, सुकलाल बाहे, संध्या सिंगनधुपे, झाडूलाल पाचे, मेहतर पाचे, ज्ञानीराम पाचे, केवलराम पाचे, लखनलाल पाचे, पूनाउ मतारे, सरपंच नमिता शहारे, उपसरपंच अनिल डोंगरे, सदस्य व्यंकटराव मेश्राम, सुशील सहारे, मुख्याध्यापक अजय चौरे उपस्थित होते.
महात्मांच्या विचारांचा सुगंध अनंतकाळ दरवळत राहील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 22:27 IST
महात्मा जोतिबा फुले हे एक भारतीय विचारक, समाजसेवक, लेखक, आणि क्र ांतिकारी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या याच कार्याने त्यांना महात्मा बनवलं. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली आणि अनेक अडथळे पार करत त्यांनी महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले.
महात्मांच्या विचारांचा सुगंध अनंतकाळ दरवळत राहील
ठळक मुद्देविनोद अग्रवाल : ग्राम बलमाटोला येथील पुण्यतिथी कार्यक्र म