शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनीतही सजली ‘माणुसकीची भिंत’

By admin | Updated: June 23, 2017 01:14 IST

प्रत्यक्ष केलेले दान हे उपकार तर अप्रत्यक्ष दान हे औदार्य व माणुसकीचे प्रतीक आहे. कुणाला नवीन वस्तूंचे मोल नसते तर कुणाला जुन्या वस्तूंचे आकर्षण असते.

‘नको असेल ते द्या...: हवे असेल ते घेऊन जा’लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : प्रत्यक्ष केलेले दान हे उपकार तर अप्रत्यक्ष दान हे औदार्य व माणुसकीचे प्रतीक आहे. कुणाला नवीन वस्तूंचे मोल नसते तर कुणाला जुन्या वस्तूंचे आकर्षण असते. समाजाची रचना आगळीवेगळीच आहे. अलीकडे ‘नको असेल ते द्या... हवे असेल ते घेवून जा...’ अशा साध्या सूत्रावर आधारलेली ‘माणुसकीची भिंत’ नावाची नवी चळवळ शहरी व ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय ठरत आहे. अशा संवेदनशील समाजमनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेला ‘माणूस’ या माणुसकीच्या भिंतीत दिसून येतो.माणुसकीच्या भिंतीत कोणी तरी मागण्यासाठी येतो अन् कोणीतरी देण्यासाठी. दाता कोण आहे ते याचकाला माहिती नाही. आपण देतो ते कुणाला देतो ते दात्यालाही माहिती नसल्याने दातृत्वाचा अहंकार नाही. अन् याचक असला तरी त्याच्या चेहऱ्यावर आर्जव नाही. हे फार सुंदर चित्र आहे. अशीच एक ‘माणुसकीची भिंत’ येथील बसस्थानक परिसरात दिसून येते. एरव्ही ज्या भिंतीवर मोर्चा, निदर्शने किंवा उत्पादक कंपन्यांच्या जाहिराती दिसायच्या ते चित्र आता पालटले आहे. ही माणुसकीची भिंत आहे तरी कशाची? तर बसस्थानकाच्या दर्शनी आवारभिंतीला हँगर व खिळे ठोकून जुनेच परंतु स्वच्छ धुतलेले कपडे, चादर, ब्लेंकेट व अन्य वस्तू अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांच्या पँटशर्टपर्यंत लटकून आहेत. याचक हा आपल्या मापाचे व आवडीचे कपडे निवडून घरी आनंदाने घेवून जातो.दाता कोण आहे त्याला माहिती नाही. पण माझीही काळजी घेणारे समाजात कुणीतरी आहेत. या आशावादाने तो मनोमन सुखावतो. हे सारे चित्र ज्या भिंतीमुळे समोर येते ती भिंत केवळ दगड मातीची कशी राहू शकते. ज्या भिंतीने जातीपातीचीही अडसर जमीनदोस्त केली ती दगड- मातीची राहिलीच नाही.ती केवळ अन् केवळ ‘ माणुसकीचीच भिंत’ आहे. माणुसकीच्या या भिंतीमुळे अनेक कुटुंबांच्या घरी चिल्यापिल्यांच्या आनंदातच भर पडते. एक प्रकारे ‘एकमेका साह्य करु.. अवघे धरु सुपंथ’ असाच हा ‘माणुसकीची भिंत’ उपक्रम आहे.