देवरीच्या वाॅर्ड क्रमांक ८ येथील आरोपीने एका महिलेस उपचाराकरिता त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले. तिला बेडवर ठेऊन डॉ. अमित सुखचंद येडे यांना बेशुद्ध महिलेचा तत्काळ उपचार कर असे जोरात ओरडला. त्यावर डॉक्टर यांनी हॉस्पिटल आहे हळू बोल, पेंशटला त्रास होतो असे म्हटल्यावर आरोपीने जोरजोरात ओरडून तू ताईचा उपचार कर तिला काही झाले तर तुझा हॉस्पिटलची तोडफोड करीन, जाळून टाकीन असे बोलून भांडण केले. ताे शिवीवगाळ करीत असताना बाजूच्या गणेश मेडिकल येथे काम करणारा मोहीम राजाराम कठाणे (२१) रा. वाॅर्ड क्रमांक १४ देवरी याने आरोपीला डॉक्टरसोबत भांडण का करतोस, असे विचारले असता आरोपीने टाटा सुमोमधील रॉडने त्याच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर मारून जखमी केले. डॉ. अमित सुखचंद येडे (३८) रा. वाॅर्ड क्रमांक ८ यांच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी भा.दं.वि.च्या कलम ४४७, ३२४,५०४, ५०६. सहकलम ४ महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचे हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधि. २०१० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक उरकुडे करीत आहेत.
डॉक्टरशी वाद घालून एकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:30 IST