शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार घरकुलांना मंजुरी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:49 IST

तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांची अडचण लक्षात घेवून तालुक्यात २० हजार घरकुलाचा कोटा मंजूर करण्यात यावा. शौचालयाचे बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांची थकीत देयके त्वरीत देण्यात यावी. तसेच रोजगार सेवकांचे मागील दीड वर्षांपासून थकीत असलेले मानधन त्वरीत देण्यात यावे अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने जि.प.अध्यक्ष सीमा मडावी व तालुका अध्यक्ष प्रकाश रहमतकर यांच्या नेतृत्त्वात बुधवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून केली.

ठळक मुद्देरोजगार सेवकांचे थकीत मानधन काढा : तालुका काँग्रेस कमिटीचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांची अडचण लक्षात घेवून तालुक्यात २० हजार घरकुलाचा कोटा मंजूर करण्यात यावा. शौचालयाचे बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांची थकीत देयके त्वरीत देण्यात यावी. तसेच रोजगार सेवकांचे मागील दीड वर्षांपासून थकीत असलेले मानधन त्वरीत देण्यात यावे अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने जि.प.अध्यक्ष सीमा मडावी व तालुका अध्यक्ष प्रकाश रहमतकर यांच्या नेतृत्त्वात बुधवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून केली.मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेल्या निवेदनातून शासनातर्फे रमाई आवास, पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार २०११ मध्ये गोंदिया तालुक्यातील २७ हजार लाभार्थी घरकुल योजनेस पात्र ठरले होते. मात्र आतापर्यंत केवळ ६ ते ७ हजार घरकुलाचे वाटप करण्यात आले आहे. मागील सात आठ वर्षांपासून २० हजार घरकुल लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. तर ज्यांचे घरकुल मंजूर करण्यात आले त्यांना अद्यापही बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला नाही. काही लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामासाठी पहिला २० हजार रुपयांचा हप्ता मिळाल्यानंतर बांधकामाला सुरूवात केली. मात्र यानंतर त्यांना उर्वरित पैसे न मिळाल्याने त्यांना सावकारांकडून कर्ज काढून बांधकाम करावे लागत आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांच्या थकीत देयकाची रक्कम त्वरीत देण्यात व २० हजार घरकुल बांधकामाला मंजुरी देण्याची मागणी तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे. शासनाच्या योजनेतंर्गत शौचालय बांधकामासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम करुन सुध्दा त्यांना मागील दीड वर्षांपासून त्याची देयके देण्यात आली नाही. त्यामुळे हे लाभार्थी पंचायत समिती कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहे. त्यांची अडचण लक्षात घेवून त्यांना त्वरीत देयके देण्यात यावी. रोजगार हमी योजनेवर कार्यरत रोजगार सेवकांना मागील दीड वर्षांपासून अद्यापही मानधन आणि प्रवास भत्त्याची रक्कम देण्यात आली नाही. परिणामी रोजगार सेवकांची आर्थिक कोंडी झाली असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली असल्याची बाब शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या लक्षात आणून दिली. याची दखल घेत बलकवडे यांनी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी कोरडे यांना बोलावून रोजगार सेवकांचे थकीत मानधन त्वरीत काढण्याचे निर्देश दिले. तसेच उर्वरित मागण्यांवर सुध्दा लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात सभापती रमेश अंबुले, विमल नागपुरे, विजय लोणारे, सुरजलाल महारवाडे, विठोबा लिल्हारे, माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, हरिचंद कावळे, बंटी भेलावे, इंद्रायणी धावाडे, योगराज उपराडे, स्रेहा गौतम, प्रकाश डहाट, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, प्रिया मेश्राम, ओमप्रकाश भक्तवर्ती, निता पटले, विनिता टेंभरे प्रमिला करचाल, गुड्डू ठाकूर उपस्थित होते.