लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेतर्फे गुरूवारी (दि.१५) ला बोलाविण्यात आलेल्या स्थायी समितीच्या सभेत तिन्ही विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीच्या सर्वच सदस्यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. आता शुक्रवारी (दि.१६) होणाºया सभापतींच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.तब्बल सात महिन्यांनंतर नगर परिषदेतील स्थायी समितीची सभा गुरूवारी नगराध्यक्षांच्या दालनात पार पडली. नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्यासह उपाध्यक्ष शिव शर्मा, बांधकाम समिती सभापती घनशाम पानतवने, महिला-बाल कल्याण समिती सभापती अनिता मेश्राम, नियोजन समिती सभापती मैथुला बिसेन, पाणी पुरवठा समिती सभापती दिलीप गोपलानी, शिक्षण समिती सभापती भावना कदम, नगर विकास आघाडीचे सचिन शेंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजय रगडे व कॉंग्रेसचे सुनील भालेराव या सदस्यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली.कमी दराच्या निविदांना मंजुरी देणे, येत्या वर्षाकरिता गुंठेवारी मुदतवाढ मिळणे व बैठकी बाजाराच्या वापाऱ्यांना परवाने व ओळखपत्र देणे या तीन विषयांना घेऊन बोलाविण्यात आलेल्या या सभेत उपस्थित सर्वच सदस्यांच्या सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, सभेत उपस्थित सदस्यांनी नगर परिषदेच्या सभा नियमीतपणे घेण्यात याव्या. अशी मागणी अध्यक्षांकडे केली. यावर अध्यक्षांनी न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा खंड पडत असल्याचे सांगत पुढे नियमीतपणे सभा घेण्याचे आश्वासन दिले.बांधकाम समितीसाठी सदस्यांची धावपळशुक्रवारी (दि.१६) नगर परिषद सभापतींची निवड केली जाणार असल्याने यात सर्वात महत्वाचे समजल्या जाणारे बांधकाम समिती सभापतीपद मिळविण्यासाठी सदस्यांची धावपळ सुरू असल्याचे ऐकीवात आहे. बांधकाम समितीसाठी धर्मेश (बेबी) अग्रवाल, रत्नमाला ऋषीकांत साहू, अफसाना मुजीब पठाण, भावना दीपक कदम यांची नावे चर्चेत असतानाच विद्यमान सभापती घनशाम पानतवने यांच्या नावाचीही चर्चा आहे. वर्षा खरोले, बेबी अग्रवाल, रत्नमाला साहू, अफसाना पठाण व नितू बिरीया यांच्यातूनच सभापतींची निवड केली जाणार असल्याची माहिती आहे. आता यात कुणाला कोणता विभाग देण्यात यावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाºयांची रात्री बैठक होणार आहे.
सर्वच विषयांना सर्वानुमते मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 23:35 IST
नगर परिषदेतर्फे गुरूवारी (दि.१५) ला बोलाविण्यात आलेल्या स्थायी समितीच्या सभेत तिन्ही विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीच्या सर्वच सदस्यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली.
सर्वच विषयांना सर्वानुमते मंजुरी
ठळक मुद्देस्थायी समितीची सभा : आज होणार सभापतींची निवड