शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

तिरोडा बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती

By admin | Updated: April 26, 2015 01:08 IST

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियमन १९६३ चे कलम ४५ (१) नुसार व मा. पनन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे ...

तिरोडा : महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियमन १९६३ चे कलम ४५ (१) नुसार व मा. पनन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेश क्र. सीएम आर/आर/३५/अ‍ॅक्ट व रुल्स दि.१८ सप्टेंबर १९८१ या द्वारे अधिकारानुसार जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय अहेर यांनी बाजार समिती संचालक मंडळाला अधिक्रमण केले आहे. तसेच उक्त कायद्याचे कलम ४५ (२) क मधील तरतुदीनुसार बाजार समितीचे कार्य पार पाडण्याकरिता सहायक निबंधक अनिल गोस्वामी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. संचालक मंडळाने विविध प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीला आर्थिक नुकसानीत टाकले. त्याबाबत मुकेश अभिमन बरियेकर यांनी वरिष्ठांकडे वारंवार पाठपुरावा केला.त्यात बेकायदेशीर लॉटरी दुकान, गाळे वाटप, बेकायदेशीर आठवडी बाजार, बैठकी व मवेशी बाजार ठेका देणे, उपसभापती यांनी मुलाला कामावर घेण्याकरिता समितीची दि. २९ जानेवारी १४ रोजी विशेष सभा बोलावून ४/२०१४ ठराव क्र.९/१ पारीत करणे, शेतकरी प्रतिनिधी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आडत व्यवसाय करुन पदाचा गैरवापर करणे, बेकायदेशीर खर्चाची उधळपट्टी, संचालक मंडळ अग्रीम, आर.के.व्ही.वाय. योजनेंतर्गत तयार करण्यात आलेले गोदाम बेकायदेशीर परस्पररीत्या समिती सदस्याने रासायनिक खताच्या साठ्यासाठी वापरणे आणि त्यामुळे शेतमाल तारण योजना राबवणे अशक्य असणे, उत्तम कोतवाल यांना सचिव पदाचा पदभार सोपविण्यास नकार दिल्याबाबत वरील सर्व मुद्यांवर सविस्तर सखोल चौकशी केली. संबंधितांना खुलासे मागविण्यात आले. काहींनी खुलासे ही सविस्तर सादर केले. पण ते समाधानकारक नसल्याने जिल्हा उपनिबंधकांनी जा. क्रमांक/जिऊनि/वि-१/कृउबास/ तिरोडा कलम ४५/४१६५/१५द कार्यालय, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया दि. २४ एप्रिल २०१५ नुसार बाजार समिती संचालक मंडळाचे अधिकार कमी करुन प्रशासक म्हणून सहा. निबंधक अनिल गोस्वामी यांची नियुक्ती केली. प्रशासकांनी कार्यभार ग्रहण केल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीच्या आत सदर बाजार समितीच्या निवडणूक त्या कालावधीत घेतल्या जातील अशी कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)