शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

मत्स संवर्धनाचा कार्यक्रम राबवा

By admin | Updated: February 10, 2016 02:19 IST

पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात माजी मालगुजारी तलाव मोठ्या प्रमाणात आहेत.

वित्त व नियोजनमंत्री मुनगंटीवार : माजी मालगुजारी तलावांचे खोलीकरणगोंदिया : पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात माजी मालगुजारी तलाव मोठ्या प्रमाणात आहेत. या तलावात मोठ्या प्रमाणात सिंचनाची क्षमता आहे. या तलावांच्या खोलीकरणाची कामे प्रभावीपणे करून मत्स्य संवर्धनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवा, असे निर्देश वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.सोमवारी (दि.८) विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१६-१७ चा जिल्ह्याचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी राज्यस्तरीय बैठक पार पडली. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीत पालकमंत्री राजकुमार बडोले, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, आ. गोपालदास अग्रवाल, आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, पालक सचित पी.एस. मीना, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, वित्त विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, विभागीय आयुक्त अनूपकुमार, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर उपस्थित होते.मुनगंटीवार पुढे म्हणाले, जिल्ह्यात सिंचनाची क्षमता वाढविण्यासाठी माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीची कामे करण्यासाठी यांत्रिकी विभागाची मदत घ्यावी. त्यामुळे खर्च कमी येईल. विविध यंत्रणा व लोकसहभागातून तलावांच्या दुरूस्तीची व जलयुक्त शिवार अभियानाची कामे करावी. कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती जास्तीत जास्त करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मत्स्य संवर्धन व उत्पादन घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेशचा दौरा करावा, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.जिल्ह्यातील तलावांवर अतिक्रमण होणार नाही, याकडे लक्ष देण्यात यावे असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, अशा तलावांतून जास्तीत जास्त सिंचन क्षमता निर्माण होईल, याचे नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यातील १० पर्यटन स्थळांचा विकास करून जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात यावेत आणि त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी व वन पर्यटनासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा.१०० एकरापेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या तलावांच्या खोलीकरणाचे काम चांगले झाले असून त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या एक हजार ७०० तलावांतील गाळ काढण्याचे नियोजन करून तलाव खोलीकरणाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात यावा. त्यामधून मत्स्य संवर्धं मोठ्या प्रमाणात करता येईल, असे त्यांनी सांगितले. पाणी पुरवठा व स्वच्छता, ग्राम विकास, रस्ते विकास, लघू पाटबंधारे यासाठी अधिक निधी देण्यात यावे, अशी अपेक्षासुद्धा पालकमंत्री बडोले यांनी व्यक्त केली.आ. अग्रवाल यांनी माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीसाठी, दिवाबत्तीच्या विद्युत खांबासाठी, वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी अतिरिक्त निधी देण्यात यावा. तसेच निधीमध्ये कपात करण्यात येवू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१४-१५ मध्ये ८५ कोटी रूपये अर्थसंकल्पीत असता ८४ कोटी ९३ लाख रूपये खर्च करण्यात आले तर सन २०१५-१६ च्या योजनेत ११४ कोटी ९२ लाख अर्थसंकल्पीत असता जानेवारी २०१६ अखेर ३२ कोटी ३७ लाख रूपये खर्च करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१६-१७ चा प्रारूप आराखडा सादर करण्यात आला असून ८६ कोटी ५७ लाख रूपये शासनाने ठरवून दिलेलेली आर्थिक मर्यादा असून अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी १९९ कोटींची मागणी केली आहे. यामध्ये अतिरिक्त मागणी ११२ कोटी ४३ लाख रूपयांची आहे.सदर बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, जिल्हा नियोजन अधिकारी बकूल घाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)