शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

कुठलाही कायदा संविधानाशी सुसंगत असला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 6:00 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या समतादूत प्रकल्पातर्फे संविधान दिनानिमित्त संविधान साक्षर ग्राम उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यातंर्गत लोकमान्य टिळक विद्यालय कोकणा येथे आयोजित संविधान साक्षर ग्राम कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : संविधान साक्षर ग्राम सांगता समारोह

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : भारतीय संविधान म्हणजे घटना हा भारतातील सर्वोच्च कायदा आहे. भारतात तयार होणारा कुठलाही कायदा हा भारतीय संविधानाशी सुसंगतच असला पाहिजे असे बंधन आहे. तो तसा तर तो कायदा रद्द करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयला आहे. प्रत्यक्ष संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून झाली. त्या दिवसापासून प्रजा सत्तेत आली. म्हणून २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करतो. मुलभुत अधिकारावर जर गदा आली तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या समतादूत प्रकल्पातर्फे संविधान दिनानिमित्त संविधान साक्षर ग्राम उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यातंर्गत लोकमान्य टिळक विद्यालय कोकणा येथे आयोजित संविधान साक्षर ग्राम कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.या वेळी प्रामुख्याने आ. मनोहर चंद्रिकापुरे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, पोलीस उपनिरीक्षक पवार, लक्ष्मीकांत धानगाये, कविता रंगारी, दयानंद कोरे, खेमराज भेंडारकर, आशा ठाकरे, गौतमा खोब्रागडे, योगिता ब्राम्हणकर, साजन वासनिक उपस्थित होते.दीप प्रज्वलन व थोरपुरूषांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. गंगाधर परशुरामकर यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणी करुन खºया अर्थाने लोकशाहीची स्थापना केली. संविधानाची जनजागृती होणे काळाची गरज आहे.डॉ. मंगेश वानखेडे यांनी संविधान साक्षर ग्राम उपक्र म प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क अधिकार व कर्तव्य जाणून घेण्यास मदत झाली. सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा प्रसार समतादूत प्रत्येक गावात करीत असतात. प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.संविधान साक्षर ग्राम उपक्रम घेण्यामागील उद्देश प्रत्येक नागरिकांना संविधानाची माहिती व्हावी,प्रत्येक योजनाची माहिती समतादूतामार्फत नागरिकांना मिळावी. या उद्देशाने हा उपक्र म राबविण्यात आल्याची माहिती पंकज माने यांनी दिली. उपक्रमातंर्गत राज्यातील १०० गावे संविधान साक्षर करण्याचा निर्धार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन समतादूत संदेश ऊके यांनी केले तर आभार शिवाजी गहाणे यांनी मानले.या कार्यक्रमांची जनजागृतीसमतादूतामार्फत संविधान वाचन, अंधश्रद्धा निर्मूलन,वैज्ञानिक जाणीव जागृती, वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, चर्चासत्र, पथनाट्य, आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर, महिला मेळावा,सामिजक न्याय विभागाच्या योजना, कृषी विभागाच्या योजनांचा प्रचार करण्यात आला.संविधान प्रास्ताविकेचे वाटप, रोजगार संधी मेळावा या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील प्रत्येक समाजातील घटक, महिला, पुरूष, विद्यार्थी, पदाधिकारी यांना लोकशाही संविधान याबद्दल माहिती देण्यात आली.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले