शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वार्षिक उत्सव विद्यार्थी जीवनाचे अभिन्न अंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:23 IST

शाळा व विद्यालयात आयोजित वार्षिक उत्सव हे विद्यार्थी जीवनाचे अभिन्न अंग आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. आई-वडील व शिक्षकांकडून संस्कार योग्य संस्कार मिळतात.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : वार्षिक स्नेहसंमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शाळा व विद्यालयात आयोजित वार्षिक उत्सव हे विद्यार्थी जीवनाचे अभिन्न अंग आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. आई-वडील व शिक्षकांकडून संस्कार योग्य संस्कार मिळतात. तर योग्यता आणि गुणवत्ता हा सर्व विद्यार्थ्यांचा समान अधिकार असल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील मोहाडी येथील स्व.सुलोचनादेवी पारधी विद्यालय व श्री सुदामा कनिष्ठ विद्यालयाचे वार्षिक स्रेहसंमेलन सोमवारी (दि.७) आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.मधुकर कुकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.सेवक वाघाये, माजी उपाध्यक्ष रमेश पारधी, सभापती कलाम शेख, अमरनाथ रगडे, बाळा ठाकूर, सरपंच कविता दमाहे, सत्यफुला लेंडे, उषा बोंदरे, पोर्णिमा बुराडे, त्रिशुला दमाहे, सीमा रहांगडाले, ईश्वर गिºहेपुंजे, मुर्लीधर गायधने, नरेश ईश्वरकर, रामकृष्ण पुंडे, डी.एल.पात्रे, आशा भुटकुरे, आनंद सिंगनजुडे, गणेश निमजे, रागिनी सेलोकर, अरुण श्रीेपाद, सुनिता सोरते, शरद तितीरमारे, प्रमोद तितीरमारे, मिलिंद लांजेवार, पुरूषोत्तम झलके, कार्यवाह अविनाश चौधरी, खुशाल शेंडे, आयुष माहुले, समीक्षा गोखले उपस्थित होते.अग्रवाल म्हणाले, योग्यता आणि गुणवत्ता ही कठोर परिश्रम व प्रामाणिकतेने प्राप्त होत असते. शारीरिक व बौध्दीक विकासाप्रती प्रत्येक विद्यार्थ्याने सजग राहून योग्य बनण्याचा प्रयत्न केल्यास यश नक्कीच प्राप्त होत असल्याचे सांगितले. तितीरमारे म्हणाले आ.अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. संस्थेच्या मंत्रालयीन स्तरावरील कामांना अग्रवाल यांचे नेहमीच सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी सुद्धा या वेळी मार्गदर्शन केले. या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कला गुणांचे सादरीकरण केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल