गोंदिया : गेल्या १५ दिवसांपासून चारही मतदार संघात धडाडणाऱ्या प्रचारतोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जाहीर प्रचाराचा कालावधी सायंकाळी संपणार असल्यामुळे सर्व प्रमुख पक्षांनी दुपारी गोंदिया शहरात रॅली काढून शहरवासीयांचे आशीर्वाद घेतले.मात्र दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे या रॅलीतील उत्साह काहीसा मंदावल्याचे दिसत होते.काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल, भाजपाचे विनोद अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक उर्फ गप्पू गुप्ता, शिवसेनेचे राजकुमार कुथे आदींनी वेगवेगळ्या भागात जाऊन रॅलीद्वारे नागरिकांना अभिवादन केले. ढोलताशासह निघालेली भाजपची रॅली शहराच्या मुख्य मार्गाने फिरत असताना उमेदवारासह कार्यकर्ते पावसातच भिजत होते, तर काँग्रेसच्या रॅलीतील प्रत्येक कार्यकर्त्याने छत्रीचा सहारा घेतला होता. त्यामुळे सर्वत्र छत्र्याच छत्र्या दिसत होत्या.
रिमझीम पावसात प्रचाराची सांगता
By admin | Updated: October 13, 2014 23:22 IST